Maharashtra Breaking LIVE: नाशिकचे माजी महापौर अशोक मुर्तडक यांची 200 तोळे सोन्याची फसवणूक, सरा

Maharashtra Rain News : गेल्या काही दिवसापासून राज्यात पावसानं दडी मारल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळं शेतकरी चिंतेत आहेत. अशातच आज राज्यातील काही भागात जोरदार पावसाने हजेरी लावली (Maharashtra Rain News)  आहे. त्यामुळं काही प्रमाणात शेतकऱ्यांना (Farmers) दिलासा मिळाला आहे.

गोंदियाच्या तिरोडा नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीतील डेकोरेशन व केटरींगचे बिल काढून दिल्याच्या मोबदला म्हणून 1 लाख 20 हजार रूपयांची मागणी करणाऱ्या नगराध्यक्ष तसेच खासगी व्यक्तीवर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे. तिरोडा नगराध्यक्ष अशोक असाटी (54, रा. तिरोडा) व कैलास किसन वाघमारे अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. नाशिकच्या उपनगर पोलिस ठाण्यातील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मिलिंद शेजवळ आणि पोलीस कॉन्स्टेबल गणेश कुमावत यांना दहा हजारांची लाच घेताना अटक

नाशिकचे माजी महापौर अशोक मुर्तडक यांच्या कुटुंबाची तब्बल २०० तोळे सोन्याची फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. घरातील सोन्याचे दागिने दुप्पट करून देण्याचे आमिष दाखवत एका सराफ व्यावसायिकाने हा गंडा घातल्याचा आरोप असून, पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Comments are closed.