अंगोलामध्ये दोन कुख्यात गुंडांना अटक.

चंदीगड :

पंजाब-हरियाणा पोलिसांनी मिळून एका मोठ्या आंतरराष्ट्रीय अभियानाला यशस्वीपणे पूर्ण केले आहे. आफ्रिकेतील देश अंगोलामध्ये पोलिसांनी 2 कुख्यात गँगस्टर्सना अटक केली आहे. केंद्रीय यंत्रणांच्या मदतीने पंजाब तसेच हरियाणा पोलिसांनी ही कारवाई केली आहे. वरिंदर उर्फ जॉबन सॅदोक आणि मनजोत अशी या गँगस्टर्सची नावे आहेत.  गँगस्टर वरिंदर हा पंजाबमध्ये 4 हत्यांप्रकरणी वाँटेड होता, तर मनजोत हरियाणात अनेक गुन्ह्dयांप्रकरणी वाँटेड होता.  दोन्ही गँगस्टर गोपी घनशामपुरिया आणि डोनी बल टोळीचे सदस्य होते. वरिंदर विरोधात पंजाब सरकारने 5 लाख रुपयांचे इनाम घोषित केले होते.

विदेशी भूमीवरील या अभियानानंतर दोन्ही गँगस्टर्सना भारतात आणण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. अशाप्रकारे पंजाब-हरियाणाच्या गँगस्टर्सवर विदेशातही कारवाईचा विळखा घट्ट करण्यात येत आहे. पंजाब पोलिसांनी दोन्ही गँगस्टर्सच्या विरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी करविली होती आणि सातत्याने याप्रकरणी आंतरराष्ट्रीय यंत्रणांशी संपर्क साधला जात होता.

 

 

Comments are closed.