नागालँडमध्ये पूर आणि भूस्खलनामुळे 9 जणांचा मृत्यू.

कोहिमा:

नागालँडच्या मोन जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे पूर तसेच भूस्खलनाचे संकट निर्माण झाले असून आतापर्यंत 9 जणांना जीव गमवावा लागला आहे. मंगळवारी आणखी 5 मृतदेह प्राप्त झाले तर चार जण अद्याप बेपत्ता आहे. त्यांचा शोध घेण्यासाठी अभियान हाती घेण्यात आले आहे. बचावकार्याला वेग देण्यासाठी सैन्याची मदत घेतली जात आहे. राज्यभरात अतिवृष्टीमुळे कमीतकमी 7,460 लोक प्रभावित झाले आहेत. तर नैसर्गिक आपत्तीमुळे मोन जिल्हा सर्वाधिक प्रभावित ठरला आहे. तेथील भूस्खलनाच्या घटनांमध्ये 9 जणांना जीव गमवावा लागला. ज्यातील 5 मृत्यू हे मोन शहरातील शांतम भागात झाले आहेत. नागिनीमोरा येथे आलेल्या पूरात वाहून गेलेल्या 4 जणांना सुरक्षित वाचविण्यात आले आहे. तर 4 जण अद्याप बेपत्ता असल्याचे सांगण्यात येत आहे. राज्यातील 10 जिल्ह्यांमधील शेकडो घरांचे नुकसान झाले आहे.  पाहणीला वेग आल्यावर हा आकडा वाढण्याची पूर्ण शक्यता असल्याचे अधिकाऱ्यांचे सांगणे आहे.

Comments are closed.