ट्रेंड – जुनी वही अन् ‘बकेट लिस्ट’
इन्स्टाग्रामवरील आशुतोष प्रतिहस्त @ashutoshpratihast या युजरने आपल्या वडिलांची जुनी वही वाचतानाचा एक हृदयस्पर्शी व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये वडिलांच्या एका साध्या सवयीने आशुतोष यांचा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा बदलला, याबद्दल चर्चा होत आहे. या वहीत एक स्वप्न वारंवार लिहिलेले असते. त्यात रोजच्या आयुष्यातील छोट्या-छोट्या आनंदांबद्दल कृतज्ञता व्यक्त करत देवाचे आभार मानले आहेत. जेव्हा ते वडिलांना याबाबद्दल विचारतात तेव्हा वडील म्हणतात असे करण्यासाठी त्यांना ‘द सीक्रेट’ या पुस्तकाने प्रेरित केले. या व्हिडीओला 67 हजार 581 लोकांनी लाईक केले आहे.
Comments are closed.