पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत; अनेक एक्सप्रेस गाड्यांच्या सेवेत बदल
पावसाने देशभरात हाहाकार माजवला आहे. पावसामुळे बुधवारी रेल्वे मार्गाखालील भराव वाहून गेल्याने पश्चिम रेल्वेवरील लांब पल्ल्याच्या वाहतुकीवर याचा परिणाम झाला आहे. यामुळे पश्चिम मार्गावरील काही गाड्या शॉर्ट टर्मिनेट करण्यात आल्या आहेत. काही गाड्या निर्धारीत स्थानकाऐवजी पुनर्निर्धारित करण्यात आल्या आहेत. उमरगाम रोड-वलसाड मेमू आणि वलसाड-उमरगाम रोड मेमू रद्द करण्यात आल्या आहेत.
शॉर्ट टर्मिनेट केलेल्या गाड्या
- बोरीवली-वलसाड मेमू वापीपर्यंत चालणार
- अहमदाबाद-बांद्रा टर्मिनस कर्णावती एक्सप्रेस वलसाड (BL) पर्यंत चालणार
- अहमदाबाद-मुंबई सेंट्रल डबल डेकर एक्सप्रेस नवसारी (NVS) पर्यंत चालणार
- वडोदरा-डहाणू रोड बिलीमोरा (BIM) पर्यंत चालणार
- मुंबई सेंट्रल-वापी प्रवासी गाडी घोलवड (GVD) पर्यंत चालणार
- भुज-दादर सयाजीनगरी एक्सप्रेस सुरत (ST) पर्यंत चालणार
- अजमेर-बांद्रा टर्मिनस सुपरफास्ट एक्सप्रेस वलसाड (BL) पर्यंत चालणार
पुनर्निर्धारित केलेल्या गाड्या
- बांद्रा टर्मिनस-अहमदाबाद कर्णावती एक्सप्रेस वलसाड (BL) येथून 16:20 वाजता सुटेल व बांद्रा टर्मिनस-वलसाड दरम्यान रद्द राहील.
- मुंबई सेंट्रल-अहमदाबाद डबल डेकर एक्सप्रेस नवसारी (NVS) येथून 17:20 वाजता सुटेल व मुंबई सेंट्रल-नवसारी दरम्यान रद्द राहील.
- डहाणू रोड-वडोदरा गाडी बिलिमोरा (BIM) येथून 17:20 वाजता सुटेल व डहाणू रोड-बिलिमोरा दरम्यान रद्द राहील.
- वापी-मुंबई सेंट्रल प्रवासी गाडी घोलवड (GVD) येथून 14.38 वाजता सुटेल व वापी-घोलवड दरम्यान रद्द राहील.
- दादर-भुज सयाजीनगरी एक्सप्रेस सुरत (ST) येथून 19:35 वाजता सुटेल व दादर-सुरत दरम्यान रद्द राहील.
- बांद्रा टर्मिनस-अजमेर सुपरफास्ट एक्सप्रेस वलसाड (BL) येथून 20:15 वाजता सुटेल व बांद्रा टर्मिनस-वलसाड दरम्यान रद्द राहील.
Comments are closed.