उमलत्या वयात विद्यार्थ्याना पोलिसांकडून धडे! रत्नागिरी पोलिसांचे ‘मिशन रायसिंग फ्लॉवर्स’
उमलणाऱ्या वयात मोबाईल आणि इंटरनेटच्या आहारी जाऊन लहान मुले सायबर गुन्हेगारीचे शिकार होत आहेत. लहान वयातच मुलांना सायबर गुन्ह्याबाबत जनजागृती निर्माण करावी या उद्देशाने रत्नागिरी पोलीस दलाने मिशन रायसिंग फ्लॉवर्स अंतर्गत विद्यार्थ्याशी संवाद सुरू केला आहे.
मुकुल माधव विद्यालय रत्नागिरी येथे पोलिसांनी सायबर जनजागृतीपर कार्यक्रम आयोजित केला होता. जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत सायबर जनजागृती, वाहतूक जनजागृती, गुड टच बॅड टच, स्वसंरक्षण, अंमली पदार्थ जनजागृती आणि करियर मार्गदर्शन याविषयावर मार्गदर्शन केले. रत्नागिरी शहरातील पटवर्धन हायस्कूल येथे अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महमुनी यांनी विद्यार्थ्यांना याच विषयांवर मार्गदर्शन करून त्यांच्याशी संवाद साधला.
Comments are closed.