काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला; एक हुतात्मा.

गस्त वाहनातील पोलिसांवर गोळीबार : शोधमोहीम जारी

न्यूजपेपर सोसायटी, श्रीनगर

जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यात बुधवारी दहशतवाद्यांनी पोलिसांच्या गस्त वाहनावर अचानक हल्ला केला. या भ्याड हल्ल्यात एक हेड कॉन्स्टेबल हुतात्मा झाला आहे. एका वाहनात सवार दहशतवाद्यांनी गस्त घालणाऱ्या पोलीस पथकाच्या दिशेने गोळीबार केला होता.

अमरनाथ यात्रेच्या सुरक्षेत तैनात आशिफ हुसैन हे या हल्ल्यात जखमी झाले, त्यांना अनंतनाग येथील रुग्णालयात हलविण्यात आले होते, तेथे त्यांचा मृत्यू झाल्याचे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. लष्कर-ए-तोयबाची सहयोगी संघटना ‘द रेजिस्टेंस फ्रंट“ने सोशल मीडियावर पोस्ट करत या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.

हल्ल्याची घटना अनंतनाग शहराच्या लाल चौक भागात घडली आहे. पोलीस टीम परिसरात नियमित गस्त घालत असताना एका वाहनातून दहशतवाद्यांनी बेछूट गोळीबार सुरू केला होता, या गोळीबारात हेड कॉन्स्टेबलला स्वत:चा जीव गमवावा लागला आहे.

सुरक्षा दलांची कठोर अॅक्शन

हल्ल्याची माहिती मिळताच स्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सुरक्षादलांच्या अतिरिक्त तुकड्या त्वरित घटनास्थळी पोहोचल्या. पोलीस, सीआरपीएफ आणि सैन्याच्या संयुक्त टीमने पूर्ण लाल चौक आणि आसपासच्या भागांमध्ये कठोर नाकाबंदी केली आहे. वाहनात सवार दहशतवाद्यांच्या पलायनाचे सर्व संभाव्य मार्ग सील करण्यात आले आहेत. हल्लेखोरांना ट्रॅक करणे आणि त्यांना पकडण्यासाठी शोधमोहीम राबविण्यात येत आहे. काश्मीर खोऱ्यात सुरक्षा वाढविण्यात आली असून पूर्ण भागात हायअलर्ट घोषित करण्यात आला आहे. प्रशासन अन् सुरक्षा यंत्रणा स्थितीवर सातत्याने नजर ठेवून

आहेत.

Comments are closed.