चहासोबत कोणते बिस्किट खावे, गोड की खारट?

चहाचा घोट बिस्किट शिवाय अपूर्णच असतो. गरमागरम आणि वाफाळलेल्या चहासोबत बिस्किट बुडवून खाण्याची सवय आपल्या संस्कृतीचा एक अविभाज्य भाग बनली आहे. मात्र, सध्या चहाप्रेमींमध्ये एका गोष्टीची जोरदार चर्चा सुरू आहे ती म्हणजे चहासोबत नक्की कोणते बिस्किट खावे, गोड की खारट?

कमी साखर असलेली साधी बिस्किट्स चहात बुडवून खाल्ल्यास अतिरिक्त कॅलरी टाळता येते.
खारट बिस्किटांमध्ये सोडियमचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे अशी बिस्किट्स जास्त खाल्ल्याने रक्तदाब वाढण्याचा धोका असतो.
पूर्ण धान्य असलेली बिस्किट्स पचनासाठी उत्तम असतात. तसेच ते जास्त वेळ पोट भरलेले ठेवतात. त्यामुळे चहासोबत खाण्यासाठी हा उत्तम पर्याय आहे.
क्रिम, चॉकलेट किंवा साखर लावलेली बिस्किट चहासोबत जरी चविष्ट लागत असली तरी आरोग्यासाठी ती फायदेशीर नसतात.
चहासोबत किती बिस्किट खावीत? चहासोबत दोन ते तीन बिस्किट खाणे पुरेसे असते. जास्त प्रमाणात बिस्किट खाल्ल्यास अनावश्यक कॅलरी वाढते.
बिस्किट खरेदी करताना पॅकेटवरील घटक तपासावे. ट्रान्स फॅट किंवा हायड्रोजनेटेड तेल असलेली बिस्किट खाणे टाळावे, ती आरोग्यासाठी उत्तम नसतात.

हेही वाचा – अचानक अंधुक दिसतं? असू शकतं या गंभीर आजाराचं लक्षण

Comments are closed.