कामावर जाण्यासाठी घरातून निघाला अन् काही वेळातच हायवेलगत मृतावस्थेत सापडला; जळगावात 28 वर्षीय त
जळगाव क्राईम न्यूज : जळगाव (Jalgaon) शहरात 28 वर्षीय तरुणाचा महामार्गालगत संशयास्पद अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. श्याम सुभाष तांबेश्वर असे मृत तरुणाचे नाव असून तो व्यवसायाने बांधकाम मिस्त्री (Construction Worker) होता. सकाळी नेहमीप्रमाणे घरातून कामासाठी बाहेर पडलेला श्याम काही वेळातच मृतावस्थेत आढळल्याने त्याच्या मृत्यूबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. दरम्यान, नातेवाईकांनी हा अपघात नसून घातपात असल्याचा संशय व्यक्त करत सखोल चौकशीची मागणी केली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील तांबापुरा (Tambapura) परिसरात राहणारा श्याम सुभाष तांबेश्वर हा गुरुवारी सकाळी नेहमीप्रमाणे कामावर जाण्यासाठी घरातून बाहेर पडला होता. मात्र, काही वेळानंतर इच्छादेवी चौफुली परिसरातील समृद्धी चौक (Samruddhi Chowk) जवळील महामार्गालगत त्याचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळून आला. घटनेची माहिती मिळताच परिसरात मोठी गर्दी झाली. नागरिकांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला.
Jalgaon Crime News: घातपाताचा संशय व्यक्त करत नातेवाईकांची सखोल चौकशीची मागणी
दरम्यान, श्यामचा मृत्यू नैसर्गिक किंवा अपघाती नसून त्यामागे घातपात असण्याची शक्यता नातेवाईकांनी व्यक्त केली आहे. सकाळी व्यवस्थित कामावर गेलेला तरुण काही वेळातच मृतावस्थेत कसा आढळला, याची निष्पक्ष आणि सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून मृत्यूचे नेमके कारण काय, हा प्रश्न अद्याप अनुत्तरित आहे. शवविच्छेदन अहवाल आणि पोलिस तपासानंतरच मृत्यूमागील नेमके कारण स्पष्ट होणार आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करीत आहेत. तपासाचा अहवाल समोर आल्यानंतरच या गूढ मृत्यूचे रहस्य उलगडण्याची शक्यता आहे. मात्र, या घटनेमुळे जळगावमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ
इतर महत्त्वाच्या बातम्या
Comments are closed.