विजयच्या ‘जना नायकन’ची दमदार सुरुवात; थिएटरमध्ये चाहत्यांचा उत्साह शिगेला – Tezzbuzz

अभिनेता विजयचा शेवटचा चित्रपट “जना नायकन,” हा नुकताच प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट तमिळनाडु मध्ये प्रदर्शित होताच “थलपथी” यांच्यासाठी या प्रदर्शनाला एका उत्सवाचे स्वरूप दिले आहे. गुरुवारी तमिळनाडु मध्ये अगदी जल्लोषाचे वातावरण होते. ज्यात विजयच्या टीव्हीके पक्षाचे चाहते आणि कार्यकर्तेही सामील झाले होते. प्रेक्षकांचा उत्साह दर्शवणारे अनेक चित्रपटगृहातील व्हिडिओ सोशल मीडियावर फिरत आहेत. या चित्रपटात पूजा हेगडे, बॉबी देओल, ममिता बैजू, गौतम वासुदेव मेनन, प्रकाश राज आणि नारायण यांच्यासह प्रमुख कलाकार आहेत.

चेन्नईमधील वुडलँड्स आणि कॅसिनो यांसारख्या अनेक चित्रपटगृहांनी या बहुप्रतिक्षित चित्रपटाच्या प्रदर्शनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन केले होते. तर यावेळी विजयचे स्वागत अगदी सुंदर पध्दतीने करण्यात आले. बुधवारी रात्री विजयच्या(vijay) स्वागतासाठी आकाशात लेझर बीम प्रक्षेपित करण्यात आले आणि चाहत्यांनी उत्साही गाण्यांवर नृत्य हि केले. तसेच ड्रोन शुट ही करण्यात आले होते. तर वृतानुसार विजयने बुधवारी रात्री चित्रपटाच्या स्क्रीनिंगला अधिकाऱ्यांसोबत उपस्थिती दाखवली.

तामिळनाडूचे परिवहन मंत्री विजय तामिळन पार्थिबन म्हणाले की, ‘जना नायकन’चे प्रदर्शन हे दिवाळी आणि पोंगलसारख्या सणासारखे आहे. त्यांनी पत्रकारांना सांगितले की, त्यांनीही या चित्रपटात एक छोटी भूमिका साकारली असून हा त्यांच्यासाठी खूप खास क्षण आहे. त्यामुळे या चित्रपटाचा पहिला शो हा तमिळनाडु मध्ये एक सणासारखा साजरा करण्यात आला आहे. तसेच या चित्रपटाने ऍडवान्स बुंकिग मधुनच उत्तम कमाई केली होती. आणि आता चित्रपटाचे रेकॅार्ड हा चित्रपट माडेल हे पाहण्यासारखे आहे.

हेहि वाचा

‘बिग बॉस 20’ लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला, तर हा अभिनेता करणार पुन्हा होस्टिंग

Comments are closed.