24 जुलै रोजी आयोजित कार्यक्रम होणारच, आदित्य ठाकरे यांनी दिली माहिती

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी 24 जुलै रोजी आयोजित केलेले तिरंगा आंदोलन त्याच दिवशी होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत 24 जुलै व 26 जुलै अशा दोन्ही दिवशी कार्यक्रम होणार असून त्या दिवशी हातात कोणत्याही पक्षाचा झेंडा न घेता फक्त तिरंगा झेंडा घेऊन छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे या, असे आवाहन केले आहे.

”24 जुलै रोजी निश्चित केलेला कार्यक्रम छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे होणारच आहे. आम्ही सर्व जण त्या दिवशी माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याजवळ सायंकाळी पाच वाजता एकत्र येऊन राष्ट्रगीत गाणार आहोत तसेच 26 जुलैला सकाळी दहा वाजता तिरंगा मार्च होणार आहे”, असे आदित्य ठाकरे म्हणाले.

”२६ जुलैला सकाळी दहा वाजता तिरंगा मोर्चा आयोजित केला आहे. सर्व देशप्रेमी लोकं राजकीय झेंडे वाद बाजूला ठेवून तिथे येणं अपेक्षित आहे. २४ जुलैला आयोजित कार्यक्रम हा 26 तारखेला एकत्र करणार होतो. पण लोकांचा प्रचंड प्रतिसाद येत आहे. सतत फोन,मेसेजेस येत आहेत. लोकं विनंती करत आहेत की दोन्ही दिवशी कार्यक्रम ठेवा आम्हाला व्यक्त होता येईल. तरुण मुलं मुली ज्यांना राजकीय काही बॅकग्राऊंड नाही त्यांना व्यक्त व्हायचं आहे. 24 तारखेचा कार्यक्रम जसा आयोजित केला आहे तसाच होणार आहे. 24 तारखेला छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथील माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याजवळ पाच वाजता आम्ही राष्ट्रगीत गाणार आहोत. 26 तारखेला सकाळी दहा वाजता तिरंगा मार्च काढणार आहोत. यात कुठेही राजकीय विषय नाही. आम्हाला फक्त दोन गोष्टी हव्या आहे, मोदींकडून यावर उत्तर आणि धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा”, असे आदित्य ठाकरे म्हणाले.

Comments are closed.