Ratnagiri News – मतदारयादी पुनरिक्षणाच्या नावाखाली येणाऱ्या फसव्या संदेशापासून सावध राहा, उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गायकवाड यांचे आवाहन
सध्या मतदारयाद्यांच्या विशेष सखोल पुनरिक्षणाचा (एसआयआर) कार्यक्रम सुरू असून, या प्रक्रियेचा गैरफायदा घेत सायबर भामट्यांकडून नागरिकांची डिजिटल फसवणूक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी अज्ञात स्रोतांकडून आलेल्या कोणत्याही संशयास्पद संदेशांना (मेसेजेस) किंवा लिंक्सना बळी पडू नये, असे आवाहन उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गायकवाड यांनी केले आहे.
च्या
सध्या बीएलओ किंवा पुनरिक्षण प्रतिनिधींकडून मतदारयादी तपासणीचे काम सुरू आहे. या प्रक्रियेदरम्यान नागरिकांची कोणतीही आर्थिक किंवा वैयक्तिक माहितीची फसवणूक होऊ नये, यासाठी जिल्हा प्रशासनाने काही महत्त्वाच्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.
प्रशासनाने दिलेल्या प्रमुख मार्गदर्शक सूचना:
अज्ञात लिंक्सवर क्लिक करू नका: अनोळखी नंबरवरून आलेले संशयास्पद मेसेज उघडू नयेत किंवा त्यांना कोणताही प्रतिसाद देऊ नये. कोणत्याही लिंकवर क्लिक करण्यापूर्वी त्याची सत्यता पडताळून पाहावी.
माहिती शेअर करू नका: एसआयआर (SIR) च्या नावाने येणाऱ्या कोणत्याही बनावट संदेशांना भुलून आपली वैयक्तिक माहिती देऊ नये.
बँक तपशील आणि ओटीपी देऊ नका: कोणत्याही व्यक्तीसोबत आपल्या बँक खात्याची माहिती, ओटीपी किंवा इतर गोपनीय माहिती शेअर करू नये तसेच कोणतेही आर्थिक व्यवहार करू नयेत.
निवडणूक आयोगाच्या सेवा विनामूल्य: भारत निवडणूक आयोगाकडून त्यांच्या कोणत्याही सेवेसाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही. त्यामुळे पैशांची मागणी केल्यास त्वरित सावध व्हा असे आवाहन करण्यात आले आहे.
Comments are closed.