आषाढी एकादशीनिमित्त शेगाव संस्थानचे मंदिर रात्रभर खुले; भाविकांसाठी विशेष व्यवस्था
आषाढी एकादशीनिमित्त श्री क्षेत्र पंढरपूरला जाऊ न शकलेल्या भाविकांसाठी विदर्भाची प्रतिपंढरी म्हणून ओळख असलेल्या श्री संत गजानन महाराज संस्थान, शेगाव येथे विशेष दर्शन व्यवस्था करण्यात आली आहे. भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन शुक्रवार 24 जुलै रोजी श्रींचे मंदिर रात्रभर दर्शनासाठी खुले ठेवण्यात येणार आहे.
शनिवार 25 जुलै रोजी आषाढी एकादशीनिमित्त काकड आरती, भजन, प्रवचन, हरिपाठ, पालखी परिक्रमा तसेच रात्री 8 ते 10 या वेळेत हरिकीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे. भाविकांसाठी श्री समाधी दर्शन, श्रीमुख दर्शन, महाप्रसाद, निवास आणि अन्य आवश्यक सुविधांची व्यवस्था संस्थानतर्फे करण्यात आली असून, सेवेकरी भाविकांच्या सेवेसाठी सज्ज असल्याचे संस्थानने कळविले आहे.
Comments are closed.