फ्रान्समध्ये 15 वर्षांखालील मुलांना सोशल मीडिया बंदी
सोशल मीडियामुळे छोटय़ा मुलांवर होणाऱ्या दुष्परिणामुळे फ्रान्समध्ये 15 वर्षांखालील मुलांना सोशल मीडिया वापरण्यास बंदी घातली आहे. फ्रान्सच्या संसदेने यासंबंधीच्या विधेयकाला मंजुरी दिली आहे. हा नवीन नियम येत्या सप्टेंबरपासून लागू केला जाणार आहे. असा कायदा करणारा फ्रान्स युरोपमधील पहिला देश बनला आहे. राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी या विधेयकाचे समर्थन केले आहे.
फ्रान्समध्ये हा कायदा लागू करण्याची जबाबदारी डिजिटल नियामक आरकॉमकडे सोपवण्यात आली आहे. फ्रान्समधील हजारो पालकांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. शिक्षणमंत्री आणि ऍम्नेस्टी इंटरनॅशनलनेही म्हटले आहे की, केवळ बंदी पुरेशी नाही, तर मुलांना डिजिटल जगाच्या सुरक्षित वापराबाबत शिक्षित करणेही आवश्यक आहे. मात्र, मुलांच्या वयाची पडताळणी कशी केली जाईल, हे अद्याप स्पष्ट नाही. फ्रान्सनंतर ब्रिटन, स्पेन, ग्रीस आणि डेन्मार्क हे देशही सोशल मीडियासाठी किमान वय निश्चित करण्याच्या तयारीत आहेत.
Comments are closed.