‘जना नायगन’ची बॉक्स ऑफिसवर दमदार सुरुवात, पहिल्याच दिवशी चित्रपटाने केली इतकी कमाई – Tezzbuzz
अनेक अडचणी पार करून अखेर थलपती विजय अभिनित हा चित्रपट 23 जुलै रोजी चित्रपट गृहामध्ये रिलीज झाला आहे. ‘जना नायगन’ हा चित्रपट रिलीज होता आज तमिळनाडूमध्ये अक्षरशा एका पोंगल किंवा एखाद्या सणासारखा हा दिवस साजरा करण्यात आला. चित्रपटाच्या रिलीज दिवशी थेटर मध्ये सांस्कृतिक कार्यक्रम पार पडला. तसेच विजयचे भव्य स्वागत करण्यात आले होते. सध्या हा चित्रपट पाहिल्यानंतर प्रेक्षकांचे संमिश्र प्रतिक्रिया आता येत आहे. तरीही या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर दमदार सुरुवात मिळाली आहे.
SACNILK च्या अंदाजानुसार, ‘जना नायगन’ने भारतात पहिल्याच दिवशी 41 कोटींची निव्वळ कमाई केली. पहिल्या दिवशी हा चित्रपट 13067 शोजमध्ये प्रदर्शित झाला. देशांतर्गत 48.27 कोटी रुपये आणि परदेशात 30 कोटी रुपयांची कमाई करून, चित्रपटाची एकूण जागतिक कमाई 78.27 कोटी रुपयांवर पोहोचली आहे. त्यामळे या वर्षातील जास्त ओपनिंग करणारा चित्रपट ठरला आहे.
चित्रपटाच्या कमाईत तमिळ आवृत्तीने वर्चस्व गाजवले असून, 36.50 कोटी रुपये कमावले आहेत, तर तेलुगू आवृत्तीने 2.75 कोटी रुपये जमा केले आहेत. हिंदी आवृत्तीने 1.75 कोटी रुपये कमावले आहेत. भारतातील सर्व भाषांमधील चित्रपटाची एकूण प्रेक्षकसंख्या 41.6% होती.
एच. विनोद यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. आणि विजयचा हा अभिनय क्षेत्रातील हा लास्ट चित्रपट असणार आहे. तर यात विजयने वेत्री कोंडनची भूमिका साकारली आहे, जो एक निर्भीड माजी पोलीस अधिकारी आहे. बॉबी देओलने जॉन हिमलरची भूमिका साकारली आहे. तसेच चित्रपटात पूजा हेगडे, ममिता बैजू, गौतम वासुदेव मेनन, प्रकाश (prakash)राज आणि नारायण यांच्यासह प्रमुख कलाकार आहेत.
‘रामायण’चा ट्रेलर लांबणीवर, या कारणासाठी मेकर्सनी बदलली तारीख
Comments are closed.