रस्ते खचले, झाडे कोसळली; सलग दुसऱ्या दिवशी नाशिककरांचे हाल
नाशिक : जिल्ह्याला मुसळधार पावसाने सलग दोन दिवस झोडपून काढले आहे. नाशिक शहरात मागील चोवीस तासांत 115 मिलीमीटर, तर त्र्यंबकेश्वरमध्ये 164 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. धरण ते नदीघाट परिसरात पडणारा पावसामुळे होळकर पुलाखालून धोक्याच्या पातळीपेक्षा अधिक विसर्ग सुरू करण्यात आला. सध्या पावसाने काही प्रमाणात विश्रांती घेतली असली तरी गंगापूर धरण 98 टक्के भरल्याने त्यातून पुढील दोन दिवस विसर्ग सुरूच राहणार आहे. दरम्यान, नाशिकमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे काही ठिकाणी रस्ते खचले असून अनेक ठिकाणी झाडे कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे वाहनांचे देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
Comments are closed.