कल – चला शाळेत जाऊया…
खांद्यावर दप्तरे, डोळ्यांत स्वप्ने… पावसाळ्यात रेनकोट घालून, घनदाट जंगल आणि डोंगराळ वाटांमधून शाळेकडे निघालेल्या मुलांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये मुलांची अभ्यासाबद्दल असलेली निष्ठा नेटिझन्सची मने जिंकत आहे. लोक म्हणत आहेत की, हा केवळ पावसात शाळेत जाणाऱया मुलांचा व्हिडीओ नाही, तर प्रत्येक अडचणीवर मात करणाऱया स्वप्नांची एक कहाणी आहे.
अनेक युजर्सनी लिहिले की, खरी प्रेरणा अशा मुलांकडूनच मिळते. एका युजरने लिहिले, या मुलांची मेहनत पाहून हे स्पष्ट होते की यश मिळवणे सोपे नाही. आशा आहे की या मुलांचा संघर्ष एके दिवशी त्यांना एका चांगल्या आणि उज्ज्वल भविष्याकडे घेऊन जाईल. हा व्हिडीओ 1 लाख 4 हजार 758 जणांनी पाहिला आहे.
Comments are closed.