CWG 2026: पोलिओ आणि गरिबीवर मात करत झंडू कुमारने पटकावले कांस्यपदक! उघडले भारताच्या पदकाचे खाते
ग्लासगोमध्ये सुरू असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धा 2026 (Commonwealth Games) मध्ये भारताच्या पदकाचे खाते उघडले आहे. पॅरा-ऍथलिट झंडू कुमारने हेवीवेट पॅरा पॉवरलिफ्टिंगमध्ये 190 किलो वजनी गटात 130.9 गुणांसह तिसरे स्थान पटकावले आणि ऐतिहासिक कांस्य पदक जिंकण्याची कामगिरी केली आहे.
बिहारचा रहिवासी असलेल्या झंडू कुमारला वयाच्या पाचव्या वर्षी पोलिओ झाला, ज्यामुळे त्याला आयुष्यभर अपंगत्व आले. आता त्याने पदक जिंकून इतिहास रचला आहे.
या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा 23 जुलैला पार पडला. शुक्रवारी (24 जुलै) अनेक पदकांच्या स्पर्धांमुळे रंगत वाढली. भारतीय खेळाडूंनीही पदकांवर आपला दावा ठोकला. त्यांनी महिला आणि पुरुष पॉवरलिफ्टिंगमध्ये आव्हान दिले. यामध्ये निराशेने सुरूवात झाली असता पदकाने शेवट केला.
झंडू कुमारने 181 आणि 190 किलो वजन यशस्वीरित्या उचलून 130.9 गुण मिळवले. 196 किलो वजन उचलण्याचा त्याचा अंतिम प्रयत्न अयशस्वी ठरला. या स्पर्धेत नायजेरियाच्या इद्रिस रिलुवानने 132.8 गुण मिळवत सुवर्ण, तर इंग्लंडच्या मॅथ्यू हार्डिंगने 131.0 गुण मिळवत रौप्य पदक जिंकले. यामध्ये भारताचा आणखी एक खेळाडू सहभागी झाला होता. सुधीर सहाव्या स्थानी राहिला.
झंडू कुमारचा लढा
झंडू कुमारला सुवर्णपदक मिळाले नसले तरी, त्याने मिळवलेले कांस्यपदक तितकेच महत्त्वाचे आहे. बिहारमधील नालंदा येथील हरनौत बाजारपेठेत असलेल्या आपल्या कौटुंबिक दुकानात कुमार आधी भाजीपाला आणि नंतर केवळ बटाटे विकत असत.
कोविड-19 महामारीच्या काळात कुटुंबाला आर्थिक आधार देण्यासाठी त्याने ई-रिक्षा चालवली आणि राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत सहभागी होण्यासाठी ती विकून टाकली.
आर्थिक अडचणी आणि पोलिओवर मात करत त्याने क्रीडाक्षेत्रात पदार्पण केले. आज त्याने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत कांस्यपदक जिंकत ऐतिहासिक कामगिरी केली. (who is Jhandu Kumar wins India’s first Medal at Commonwealth Games 2026)
Comments are closed.