कॅनडामध्ये हिंदुस्थानी विद्यार्थिनीची हत्या, लिव्ह इन पार्टनरला अटक

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

उच्च शिक्षणासाठी कॅनडात गेलेल्या हिंदुस्थानी विद्यार्थिनीची लिव्ह इन पार्टनरने हत्या केली. दमनप्रीत कौर (23) असे हत्या झालेल्या तरुणीचे तर रितीश कुमार (22) असे अटक आरोपीचे नाव आहे. रितीश कुमारवर सेकंड डिग्री मर्डरचा आरोप ठेवण्यात आला आहे.

एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, दमनप्रीत कौर पंजाबमधील लुधियाना जिल्ह्यातील समराला येथील रहिवासी होती. उच्च शिक्षणासाठी पाच वर्षांपूर्वी स्टुडंट व्हिसावर दमनप्रीत कॅनडात गेली होती. कौरचा मृतदेह हिंदुस्थानात आणण्यासाठी ‘गो-फंड-मी’ मोहीम सुरू करण्यात आली आहे.

प्रकरण काय?

साउथईस्ट शाखेच्या गस्त घालणाऱ्या अधिकाऱ्यांना 9 जुलै रोजी सायंकाळी सिल्व्हरबेरी परिसरातील एका घरात एक तरुणी जखमी अवस्थेत पडल्याचा कॉल आला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमी तरुणीला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र तीन दिवसांनी उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. त्यानंतर एका तरुणाला ताब्यात घेण्यात आले.

शवविच्छेदन अहवालात तरुणीची हत्या झाल्याचे निष्पन्न झाले. गळा आवळून दमनप्रीतची तिच्या लिव्ह इन पार्टनरचे हत्या केल्याचे तपासात उघड झाले. यानंतर दमनप्रीतचा लिव्ह इन पार्टनर रितेश कुमार याला पोलिसांनी अटक करत त्याच्यावर ‘सेकंड-डिग्री मर्डर’चा आरोप ठेवण्यात आला.

Comments are closed.