उपवासाच्या दिवशी दिवसभर ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी खास टिप्स

आज (25 जूलै) आषाढी एकादशी आहे. एकादशीनिमित्ताने अनेकांचा उपवास असतो. परंतू, उपवास केला की लगेच थकवा येतो, गळून गेल्यासारखं वाटतं किंवा वारंवार तहान लागते? असं तुमच्यासोबतही होत असेल तर बातमी तुमच्यासाठी आहे.  उपवासाच्या दिवशी चुकीचा आहार आणि पाण्याच्या कमतरतेमुळे शरीरातील ऊर्जा वेगाने कमी होते आणि डिहायड्रेशनचा धोका वाढतो. पण काही सोप्या टिप्स फॉलो करून तुम्ही उपवासाच्या दिवशीही दिवसभर ॲक्टिव्ह आणि उत्साही राहू शकता.  Fasting Health Tips Marathi

नियम –

उपवासाच्या दिवशी नारळ पाणी हा इलेक्ट्रोलाइट्सचा सर्वोत्तम स्त्रोत आहे. यामुळे शरीराला झटपट ऊर्जा मिळते आणि डिहायड्रेशन होत नाही.

जर उपवासाला दही चालत असेल, तर सैंधव मीठ आणि जिरेपूड टाकून ताक पिणे पचनासाठी उत्तम ठरते.

कोमट पाण्यात लिंबू, थोडे सैंधव मीठ आणि मध मिसळून प्यायल्याने शरीरातील पाण्याची पातळी टिकून राहते.

डबाबंद रसांऐवजी ताजे संत्री, मोसंबी किंवा कलिंगडाचा रस प्यावा.

दुपारी मूठभर भिजवलेले बदाम, अक्रोड, खजूर आणि मणुके खावेत. यामुळे दिवसभर स्टॅमिना टिकून राहतो.

आहारात कलिंगड, काकडी, सफरचंद, डाळिंब आणि संत्री यांसारख्या फळांचा समावेश करा.

तळलेले साबुदाणा वडे किंवा अतितिखट पदार्थ खाण्याऐवजी साबुदाणा खिचडी किंवा भगरीची पेज, खिचडी कमी तेलात बनवून खाऊ शकता.

महत्त्वाची टीप –

उपवासाच्या दिवशी अति-तळलेले, जास्त तिखट आणि तेलकट पदार्थ खाणे टाळा. यामुळे पित्त वाढते आणि जास्त तहान लागून डिहायड्रेशन होते. तसेच चहा किंवा कॉफीचे अतिसेवन करू नका, कारण यामुळे शरीरातील पाणी वेगाने कमी होते

हेही वाचा – फ्रिज आणि भिंतीत किती अंतर असावं? छोट्या चुकीमुळे होऊ शकतं मोठं नुकसान

Comments are closed.