कहानी -3 चित्रपटातून विद्या बालनचा पत्ता कट, तिच्या जागी आता…
बाॅलीवुड अभिनेत्री विद्या बालनचा कहानी हा वेगळ्या धाटणीचा चित्रपट म्हणून प्रेक्षकांच्या मनपसंतीस उतरला. कहानी या चित्रपटाचा तिसरा भाग आता लवकरच पाहायला मिळणार आहे. आधीच्या दोन भागांमध्ये विद्या बालनने तिच्या अभिनयाने सर्वांचेच मन जिंकले. परंतु आता मात्र इथे एक मोठा ट्विस्ट आलेला आहे. कहानी 3 या आगामी भागामध्ये विद्या बालनचा पत्ता कट झाला असून, तिच्या जागी आता यामी गौतमची वर्णी लागली आहे.
अलीकडेच, यामी गौतमला 72 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात ‘आर्टिकल 370’ या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. वृत्तानुसार, यामी ‘कहानी 3’ मध्ये मुख्य भूमिका साकारणार असून, या चित्रपटाचे दिग्दर्शन सुजॉय घोष करणार आहेत. वृत्तानुसार, हा प्रोजेक्ट सध्या प्री-प्रॉडक्शनमध्ये असून, टीम चित्रपटाच्या इतर पैलूंवर काम करत आहे. असे वृत्त आज तक ने दिले आहे.
पिंकविलाच्या वृत्तानुसार, विद्या बालनने पहिल्या दोन चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका साकारली होती. पण आता मात्र कथानक नवीन वळणांवर जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
असे म्हटले जात आहे की, हा चित्रपट मागील चित्रपटांची कथा पुढे नेणार नाही, तर ‘कहानी’च्या विश्वात घडणारी एक नवीन कथा असेल. निर्माते सध्या शूटिंगच्या वेळापत्रकावर काम करत असून, लवकरच वेळापत्रक निश्चित होण्याची आशा आहे. पोर्टलने एका सूत्राच्या हवाल्याने म्हटले आहे की, कहानी 3 ही एक पूर्णपणे नवीन कथा आहे. कहानी 3 चित्रपट सध्या प्री-प्रॉडक्शनच्या टप्प्यात असून, टीम शूटिंगच्या वेळापत्रकावर काम करत आहे.
Comments are closed.