‘रामायण’नंतर रणबीर कपूर ‘धूम 4’मध्ये दिसणार? अभिनेत्याने यावर दिले स्पष्ट उत्तर – Tezzbuzz
‘रामायण’ हा चित्रपट या वर्षातील बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक आहे. आणि या चित्रपटात मुख्ख भुमिकेत अभिनेता रणबीर कपुर काम करत आहे त्यामुळे तो सध्या चर्चेत आहे. नुकतच दिल्लीतील भारत मंडपम येथे आयोजित एका कार्यक्रमाला अभिनेत्याने हजेरी लावली होती. त्यानंतर चित्रपटाच्या प्रमोशनसाठी तो परदेशात गेला. आणि त्याने नुकतेच तो रामायणच्या टिम सोबत सॅन दिएगो कॉमिक कॉनमध्ये हजेरी लावली होती. तसेच चित्रपटाचे दिग्दर्शक नितेश तिवारी, निर्माते नमित मल्होत्रा आणि यश हे देखील त्याच्यासोबत दिसले. तसेच रणबीरने त्याच्या आगमी प्रकल्पांबाबतही सांगितले आहे.
रणबीर कपूरने (kapoor) त्यांच्या आगमी चित्रपटाबाबत या कार्यक्रमात सांगितले आहे. तसेच त्यांने ‘धूम 4’ बद्दलही उघडपणे चर्चा केली. त्याने स्पष्टपणे सांगितले की तो ‘धूम 4’ चा भाग नाही. कारण खुप दिवसांपासुन रणबीर धुम 4 मध्ये असणार आहे अशी चर्चा होती मात्र त्याने आता या बाबत खरी माहीती समोर केली आहे.
एका संभाषणादरम्यान रणबीर कपूरने त्याच्या आगामी प्रकल्पांबद्दल उघडपणे चर्चा केली. जेव्हा सुत्रसंचालाकाने म्हणले की, रणबीर रामायणा व्यतिरीक्त ‘टॉक्सिक आणि ‘धूम 4’ मध्ये दिसणार आहे, तेव्हा रणबीरने लगेच उत्तर दिले, “नाही,मी ‘लव्ह अँड वॉर’ नावाच्या दुसऱ्या चित्रपटावर काम करत आहे, ज्याचे दिग्दर्शन संजय लीला भन्साळी करत आहेत. आणि तो चित्रपट 24 जानेवारी 2027 रोजी प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. म्हणजेच तो या धुम 4 मध्ये काम करत नाही.
रणबीर कपुर अभिनीत रामायण चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. त्यामुळे हा चित्रपट पाहिण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. तर हा चित्रपट दिवाळी 2026 ला येणार आहे. आणि यांचा दुसरा भाग 2027 मध्ये येणार आहे.
हेही वाचा
विजयच्या ‘जना नायकन’चा बॉक्स ऑफिसवर धुमाकुळ; चौथ्या दिवशीच येवढ्या कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री
Comments are closed.