तर आम्हाला पुन्हा सक्तीनं आंदोलनाला बसावं लागेल! काॅकरोच पार्टीचा मोदी सरकारला गर्भित इशारा
झुरळ जनता पक्ष: आंदोलकांवर कोणतीही पोलीस कारवाई केली जाणार नाही, या कराराचे पूर्णपणे उल्लंघन होत असल्याचे आपल्याला दिसून येत आहे. बिहार आणि बंगालमध्ये शेकडो विद्यार्थ्यांना अटक करण्यात आली आहे, तसेच दिल्ली आणि इतर राज्यांमध्ये शेकडो विद्यार्थ्यांवर नजर ठेवून त्यांना त्रास दिला जात आहे. दिल्लीत आंदोलकांना रसद/मदत पुरवणाऱ्या स्वयंसेवकांना ताब्यात घेतल्याच्या अनेक बातम्या समोर येत आहेत. तर लिखित मागण्या मान्य झाल्या नाहीत, तर आम्हाला पुन्हा एकदा उपोषणाला बसणे भाग पडेल, असा गर्भित आणि थेट इशारा काॅकरोच जनता पार्टीने दिला आहे. त्यामुळे राजीनाम्यानंतर गुन्हे मागे घेण्यासाठी भाजप शासित राज्यांकडून चालढकल केली जात आहे का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
प्रिय @JPNadda @डॉ जितेंद्रसिंह जी,
आंदोलकांवर कोणतीही पोलिस कारवाई न करण्याबाबत आम्ही कराराचा पूर्ण भंग पाहत आहोत. बिहार आणि बंगालमध्ये शेकडो विद्यार्थ्यांना अटक करण्यात आली आहे आणि दिल्ली आणि इतर राज्यांमध्ये शेकडो विद्यार्थ्यांवर पाळत/छळ केला जात आहे. अनेक…
— आशुतोष रांका (@AshutoshRanka) 27 जुलै 2026
पुन्हा एकदा उपोषणाला बसणे भाग पडेल
काॅकरोच पार्टीचे प्रवक्ते आशुतोष रांका यांनी ट्विट करत चर्चेमध्ये सहभागी झालेल्या मंत्री जेपी ड्डा आणि जितेंद्र सिंह यांना सुद्धा टॅग करत मागण्याची आठण करून दिली आहे. आंदोलकांवर दाखल केलेले सर्व एफ.आय.आर. (FIR) त्वरित मागे घेण्यात यावेत. अटक केलेल्या विद्यार्थ्यांना तात्काळ सोडून देण्यात यावे. दिल्ली पोलीस, केंद्रीय तपास यंत्रणा किंवा भाजप-सहयोगी राज्यांतील पोलिसांकडून (आपल्या कराराप्रमाणे) भविष्यात कोणतेही एफ.आय.आर. दाखल केले जाऊ नयेत. जर या मागण्या मान्य झाल्या नाहीत, तर आम्हाला पुन्हा एकदा उपोषणाला बसणे भाग पडेल, असा तसेच, कायदेशीर प्रकरणांबाबत झालेला लेखी करार आणि भारत सरकारसोबत ठरलेली वेळेची मर्यादा (Timelines) उद्यापर्यंत आमच्यासोबत शेअर करण्यात यावी, अशीही आमची मागणी असल्याचे म्हटले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
Sanjay Raut PC : मोदी-शाहांचा आदेश आल्यावर फडवीसांना केंद्रीय शिक्षणमंत्री व्हावंच लागेल
Comments are closed.