Guru Purnima 2026 : यंदा गुरूपौर्णिमा 3 राजयोगात साजरी होणार
गुरू हा केवळ शिक्षण, ज्ञान देणारा व्यक्ती नसून अंधारातून प्रकाशात नेणारा एक मार्गदर्शक आहे. त्यामुळे गुरुपौर्णिमेच्या दिवशी शिष्य गुरुप्रती असलेली कृतज्ञता व्यक्त करतो. महर्षी वेद व्यासांचा जन्म याच दिवशी झाला असल्याने या दिवसाला ‘व्यास पौर्णिमा’ किंवा ‘वेद पौर्णिमा’ असेही म्हणतात. 2026 मध्ये गुरूपौर्णिमा 29 जुलै रोजी साजरी होणार आहे.
गजकेसरी योग –
यंदा गुरुपौर्णिमेला गजकेसरी योग तयार होत आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, गुरु आणि चंद्राच्या विशेष स्थितीमुळे तयार होणारा हा योग शुभ मानला जातो. असे मानले जाते की गजकेसरी योगामुळे व्यक्तीचा मान आणि प्रतिष्ठा वाढते. या योगादरम्यान गुरूंची पूजा करणे आणि त्यांचे आशीर्वाद घेणे विशेष फलदायी मानले जाते.
सर्वार्थ सिद्धी योग –
मान्यतेनुसार, हा योग शुभ कार्यांसाठी शुभ मानला जातो. असे मानले जाते की या योगादरम्यान केलेली अनेक कार्ये यश देतात. तुम्ही या योगादरम्यान गुरूंची पूजा करणे, धार्मिक कार्ये करणे, मंत्रोच्चार करणे आणि दानधर्म करणे अशी कार्ये करू शकता.
रवि योग –
यंदा गुरुपौर्णिमेला रवी योग देखील तयार होत आहे. असे मानले जाते की या योगात केलेली शुभ कार्ये नकारात्मकता दूर करतात आणि जीवनात सकारात्मक ऊर्जा वाढवतात. रवी योगात सूर्यदेवाची पूजा करणे, स्नान करणे आणि दान करणे अशी कामे करायला हवीत.
या गोष्टी महत्त्वाच्या –
गुरुपौर्णिमेच्या दिवशी कुटूंबातील जेष्ठ व्यक्तींनाही तुम्ही गुरु मानून त्याच्याप्रती आदर व्यक्त करू शकता.
गुरुकडून उन्नतीचा मंत्र प्राप्त करण्यासाठी हा दिवस सर्वोत्तम मानला जातो.
या दिवशी तुम्ही तुमच्या गुरुचे आवडते कार्य किंवा त्यांची सेवा करू शकता.
हेही वाचा – जीवनात गुरु असणे का महत्वाचे ?
Comments are closed.