खेळाडूंच्या सततच्या दुखापतीसंदर्भात BCCI ऍक्शन मोडमध्ये! यापुढे 'फसवणूक' सहन केली जाणार नाही, वाचा सविस्तर
भारतीय पुरुष वरिष्ठ संघात दुखापतींचे सत्र एकामागोमाग सुरू आहे. अनेक खेळाडू दुखापतीमुळे महत्त्वाच्या सामन्यांना मुकत असल्याने, संघावर त्याचा परिणाम होत आहे. नुकतेच अनुभवी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेला मुकला आहे. या मालिकेत भारताला चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे, मात्र बुमराह मालिकेला मुकल्याने संघाचे किती नुकसान होईल, हे मालिका सुरू झाल्यावर दिसेलच.
एखाद्या खेळाडूला दुखापत झाली की ते भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (BCCI) बंगळुरूमधील सेंटर ऑफ एक्सलन्स (CoE) मध्ये जातात आणि फिट होऊन परत येतात, मात्र काही सामन्यांनंतर पुन्हा ते दुखापतग्रस्त होतात. यावर BCCI ने आता मोठा निर्णय घेतला आहे.
BCCI ने CoE च्या कार्यप्रणालीत बदल करण्याचे निश्चित केले आहे. ते CoE च्या फिटनेस कार्यक्रमाची पुर्नरचना करत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सेंटर ऑफ एक्सलन्समधील एका विशिष्ट चाचणीऐवजी सर्व क्रिकेटपटूंसाठी एक प्रामाणिक मूलभूत तंदुरुस्ती मापदंड तयार करण्यावर भर देणार आहे.
एड्रियन लेरू यांनी स्ट्रेंथ ऍंड कंडिशनिंग प्रशिक्षक म्हणून पदभार स्वीकारल्यापासून फिटनेस्ट टेस्टच्या पद्धतींमध्ये बदल केला आहे. आता यो-यो टेस्टऐवजी ब्रॉन्को टेस्ट ही मुख्य फिटनेस टेस्ट असणार आहे. BCCI च्या वैद्यकिय पथकाने ब्रॉन्को टेस्टमध्ये फिट घोषित होण्यासाठी विविध सराव पूर्ण करण्याकरिता 5:15 – 5:20 मिनिटे निश्चित केली आहे. तसेच CoE ने 2 किमी (2K) धावण्याची टेस्ट पूर्ण करण्यासाठी 9-10 मिनिटांची वेळ निश्चित केली आहे.
BCCI च्या एका सूत्राने TOIला सांगितले की, भारतीय खेळाडूंना ब्रॉन्को टेस्टची सवय नाही. गेल्या वर्षी CoE ने खेळाडूंसाठी वेगवेगळे मूलभूत निकष ठरवले होते. आता काही वरिष्ठ खेळाडूंना फिटनेस टेस्ट उत्तीर्ण होण्यासाठी खूप छोटे लक्ष्य देण्यात आले होते. तसेच त्यांनी हर्षित राणा आणि नितीश कुमार रेड्डी यांसारख्या खेळाडूंनाही फिट घोषित केले होते, जेणेकरून ते संघ व्यवस्थापनाच्या आवश्यकता पूर्ण करतील याची खात्री होईल.
“सेंटर ऑफ एक्सलन्स’च्या कर्मचाऱ्यांनी हर्षितला सांगितले आहे की त्याचे वजन 96 किलोपेक्षा जास्त नसावे. सध्या त्याचे वजन 94 किलो आहे आणि पुढील आठवड्यात त्याला फिटनेस क्लिअरन्स मिळण्याची अपेक्षा आहे. मात्र, इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघात निवड झाली तेव्हा त्याचे वजन 97 किलो होते,” असेही BCCI च्या सूत्राने पुढे सांगितले आहे.
रिपोर्ट्सनुसार, BCCI सचिव देवजीत सैकिया यांनी फिटनेस टेस्टसाठी सोपे लक्ष्य देत खेळाडूंना पूर्णपणे फिट घोषित केल्याबद्दल फिजिओ कमलेश जैन यांना फरकारलेही आहे. (BCCI into action mode over players’ recurring injuries board standarise Bronco fitness test parameters)
Comments are closed.