काळजाचा ठोका चुकवणारा VIDEO: सामना सुरू असताना वीज कोसळून 24 वर्षीय खेळाडूचा मृत्यू, अनेकजण जखमी
सामना सुरू असताना हर्ट-अटॅक किंवा चेंडू लागून खेळाडूंच्या मृत्यूच्या अनेक घटना घडल्या आहेत. नुकतेच फुटबॉलच्या मैदानात काळजाचा ठोका चुकवणारी घटना घडली. थायलंडमध्ये मंगळवारी (4 ऑगस्ट) एका मैत्रीपूर्ण सामन्यादरम्यान एका थाई फुटबॉलपटूचा वीज कोसळून जागीच मृत्यू झाला. या घटनेत अनेक खेळाडूही जखमी झाल्याचे वृत्त समोर आले आहे. या घटनेचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना थायलंडमधील सुंगई गोलोक शहराच्या फुटबॉल मैदानावर घडली. संतीफाप स्टेडियमवर स्थानिक वेळेनुसार सायंकाळी 5:30 च्या सुमारास प्रादेशिक गोलोक एफए कप फुटबॉल स्पर्धेचा उपांत्य फेरीचा सामना अबू एक्स नॉग्न सिरिन आणि सॅमकोल्ट यांच्यात सुरू होता. मुसळधार पावसात सुरु असणाऱ्या या सामन्यादरम्यान वीज कोसळली घडली आणि 24 वर्षीय सफवान अवाए (Safwan Awae) याचा मृत्यू झाला.
अवाए हा तिसऱ्या श्रेणीतील क्लब याला एफसीचा (Yala FC) विंगर होता. तो पट्टानी एफसीसाठीही (Pattani FC) खेळला होता आणि घटनेच्या काही दिवसांपूर्वीच त्याने याला एफसीसोबत करार केला होता. घटनेच्या दिवशी पोलिसांना एक आपत्कालिन कॉल आला आणि ते तातडीने तेथे पोहोचले असता, त्यांना अवाए गंभीर स्थितीत आढळला. ते त्याला वाचवू शकले नाही.
“आपत्कालीन वैद्यकीय पथकाने त्याला वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले असले तरी, या घटनेत झालेल्या गंभीर जखमांमुळे त्याचा मृत्यू झाला,” असे थुन यांनी मलेशियाची वृत्तसंस्था बर्नामाला सांगितले.
Comments are closed.