पॅरेट्स मिटींगमध्ये पालकांनी शिक्षकांना विचारावेत हे प्रश्न





आता बऱ्याच शाळांमध्ये दर महिन्याला शिक्षक आणि पालक मीटींग असते. ज्याला पीटीएंम असे म्हणतात. या मिटींग्ज मुलांबरोबरच पालकांसाठीही महत्वाच्या असतात. यामुळे या मिटींगला वर्गातील सगळ्याच मुलांचे पालक उपस्थित असतात. अशा वेळी प्रत्येक पालकाच्या सगळ्याच प्रश्नांची उत्तरे देताना शिक्षकांची दमछाक होते. यामुळे पालकांनी शिक्षकांना भरमसाठ अनावश्यक प्रश्न न विचारता मोजकेच पण महत्वाचे प्रश्न विचारावेत.

विषय
पालकांनी शिक्षकांना आपला पाल्य कोणत्या विषयात हुशार आणि कोणत्या विषयात सुमार आहे हा प्रश्न आवुर्जून विचारावा. त्यामुळे तुम्हाला तुमच्या मुलाची रुची कोणत्या विषयात अधिक आहे हे कळते. तसेच तो कोणत्या विषयात कमकुवत आहे हे देखील समजते. बऱ्याचवेळा रोजचा अभ्यास घेताना मुलांना कोणता विषय कठीण जातोय हे पालकांनाही कळत नाही.

खेळ
अभ्यासाव्यतिरिक्त मुलाचे मन कोणत्या खेळात रमते हे देखील पालकांनी शिक्षकांना विचारावे. काहीवेळा मुलांना एखाद्या ठराविक खेळातच रुची असते. त्यामुळे भविष्यात त्यांच्यासाठी ते करियरचे दुसरे ऑप्शन ठरू शकते. यामुळे मुलांच्या खेळाबदद्ल शिक्षकांना विचारावे.

अॅक्टीव्ह
पालकांनी शिक्षकांना आपलं मुल वर्गात इतर मुलांशी कसा वागतो याबद्दल विचारावे. कधी कधी मुलं पालकांसमोर शांत असल्याचे दाखवतात. पण शाळेत इतर मुलांवर दादागिरी करतात. यातून मुलांचा स्वभाव कसा आहे ते कळतं. त्यानुसार पालक मुलांशी संवाद साधू शकतात.

लक्ष केंद्रित

मुलांचे लक्ष कशात आहे आणि कशात नाही हे पालकांपेक्षा शिक्षकच अधिक स्पष्ट सांगू शकतात. कारण मुलांचा बराचसा वेळ शाळेत जातो. त्यामुळे शिक्षकांना कोणता विद्यार्थी कसा आहे हे माहीत असते. त्यामुळे मुलाच्या अभ्यासाबरोबरच त्याचा फोकस कोणत्या गोष्टींकडे सर्वाधिक असतो असे प्रश्न पालकांनी शिक्षकांना नक्की विचारावेत. त्यामुळे शिक्षकच यावर पालकांना योग्य उत्तर देऊ शकतात.



Comments are closed.