कोलंबियातील भूकंपात 132 जण ठार, 570 जखमी

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

दक्षिण अमेरिकेतील कोलंबिया देशात सोमवारी रात्री आलेल्या 7.4 तीव्रतेच्या भूकंपात आतापर्यंत एकूण 132 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 570 जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. भूंकपाच्या जोरदार हादऱयाने दीड हजारांहून अधिक घरांचे नुकसान झाले असून 18 आरोग्य केंद्रे आणि 52 शाळांनाही नुकसान पोहोचले आहे. तर 7 विमानतळांवरून काम थांबवण्यात आले आहे.

कोलंबिया जगातील सर्वाधिक भूकंपग्रस्त देशांपैकी एक आहे. येथे दरवर्षी हजारो लहान-मोठे भूकंप येतात. भूकंपानंतर पाच शहरांमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. राष्ट्रपतींनी आपत्कालीन समितीची बैठक बोलावून मदत आणि बचाव कार्यावर लक्ष ठेवण्यास सुरुवात केली आहे. एकट्या पेरेरा शहरात 60 जणांचा मृत्यू झाला आहे. जवळपास 5 लाख लोकसंख्या असलेले हे शहर भूकंपाच्या केंद्रापासून 64 किलोमीटरपेक्षा कमी अंतरावर आहे.

Comments are closed.