फॅशन जगतात टॅक्टाईल टेक्सचरचा नवा ट्रेंड
दररोज फॅशनच्या दुनियेत नवनवीन ट्रेंड असतात. परंतू सध्या एका नव्या आणि हटक्या ट्रेंडने धुमाकूळ घातला आहे तो म्हणजे टॅक्टाईल टेक्सचर्स. या ट्रेंडमध्ये केवळ कपड्यांचा रंग किंवा डिझाइन पाहिली जात नाही तर कपड्याचा स्पर्श कसा आहे यालाही महत्त्व दिलं जातं. काय आहे हा ट्रेंड आणि तो फॉलो कसा करायचा हे पाहूयात.
ट्रेंड नेमका काय?
टॅक्टाईल म्हणजे ज्याचा स्पर्श हाताला स्पष्टपणे जाणवतो. हल्ली बाजारात प्लेन कपड्यांऐवजी 3Dलूक देणारे मखमली, उभ्या लाईन्स असलेले फॅब्रिक्स अधिक प्रमाणात दिसून येते. यामध्ये लेदर, बारीक जाळीदार लेस, विणकामाचे स्वेटर्स आणि मऊ रफल्सचा समावेश आहे. हे कपडे दिसायला आकर्षक आणि रिच लूक देतात. नेहमीच्या कॉटन किंवा सिल्कपेक्षा हा ट्रेंड वेगळा ठरत आहे, कारण यामुळे साध्या आऊटफिटलाही स्टायलिश लुक मिळतो. वेस्टर्न कपड्यांपासून ते अगदी फ्युजन आणि एथनिक वेअरमध्येही हे टेक्स्टचर्स वापरले जात आहेत. एखादा प्लेन टॉप आणि त्यावर टॅक्टाईल जॅकेट किंवा प्लेन साडीसोबत एम्ब्रॉयडरी किंवा लेस असलेला ब्लाऊज तरुणाईची पहिली पसंती बनत आहे.
स्टाईल कसे कराल?
ट्रेंडचे वैशिष्ट्य म्हणजे यासाठी तुम्हाला संपूर्ण कपडे बदलण्याची गरज नाही. तुम्ही एकाच आऊटफिटमध्ये दोन वेगळे टेक्स्टचर्स एकत्र वापरू शकता. उदा. प्लेन जीन्सवर जाड विणकामाचा स्वेटर किंवा साध्या ड्रेसवर मखमली जॅकेट.
हेही वाचा – सेलिब्रिटींसारखी वेगळी ओळख हवीये? मग असा तयार करा स्वतःचा सिग्नेचर लूक
Comments are closed.