चंद्रचूड रशियाची बाजू मांडणार
युक्रेन युद्धाशी संबंधित एका आंतरराष्ट्रीय प्रकरणाच्या कायदेशीर लढय़ाची धुरा रशियाने हिंदुस्थानचे माजी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्यावर सोपवली आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय लवादात धनंजय चंद्रचूड हे रशियाची बाजू मांडणार आहेत.
हे प्रकरण युक्रेनच्या ओशचाडबँक या सरकारी बँकेच्या संदर्भातील असल्याची माहिती सांगितली जात आहे. युक्रेनच्या ओशचाडबँक या सरकारी बँकेने रशियाच्या विरोधात एक याचिका आंतरराष्ट्रीय लवादात दाखल केली आहे. हे आंतरराष्ट्रीय लवाद या प्रकरणावर आता सुनावणी घेत आहे.
Comments are closed.