टीम इंडियाचा बांगलादेश दौरा रद्द होणार; अफगाणिस्तानबरोबर खेळणार तीन टी-20 सामने
बीसीसीआयने अफगाणिस्तानविरुद्ध तीन सामन्यांच्या टी-20 आंतरराष्ट्रीय मालिकेची घोषणा केली आहे. ही मालिका 13 सप्टेंबरपासून सुरू होईल. दुसरा टी-20 सामना 15 सप्टेंबरला आणि अंतिम सामना 17 सप्टेंबरला खेळला जाईल. यामुळे हिंदुस्थानच्या बांगलादेश दौऱ्यातही अडथळा निर्माण झाला आहे. हा दौरा सप्टेंबरमध्ये होणार होता. आता हा दौरा रद्द होण्याची फक्त अधिकृत घोषणा होणेच बाकी असल्याची चर्चा क्रिकेट वर्तुळात सुरू झाली आहे.
दोन्ही देशांमधील WHOडी
बांगलादेशला आशा आहे की, हिंदुस्थानसोबतचा सध्याचा तणाव सुटेल आणि त्यांना सप्टेंबरमध्ये एकदिवसीय मालिकेसाठी यजमानपद भूषवता येईल. पण अफगाणिस्तानचा संघ दिल्लीत भारताविरुद्ध तीन टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळणार आहे. त्यामुळे ही कोंडी झाल्याचे म्हटले जात आहे.
मंत्रिमंडळात चर्चा सुरू
बांगलादेश-हिंदुस्थान मालिकेसंदर्भात मंत्रिमंडळात चर्चा सुरू आहे आणि बांगलादेशचे नवीन सरकार या दौऱ्याभोवती असलेल्या अनिश्चिततेवर तोडगा काढण्यास उत्सुक आहे. गेल्या ऑगस्टमध्ये बांगलादेशमध्ये दोन्ही संघांमध्ये तीन एकदिवसीय आणि तीन टी-20 सामने खेळवले जाणार होते, परंतु राजकीय तणावामुळे हा दौरा 2026 पर्यंत पुढे ढकलण्यात आला.
सरकारसोबत सल्लामसलत
सूत्रांनी सांगितले की, बीसीसीआय बांगलादेश सरकारशी सल्लामसलत केल्यानंतरच या प्रस्तावावर निर्णय घेऊ शकेल. बांगलादेशचे क्रीडामंत्री अमीनुल हक म्हणाले की, सरकारला लवकरच तोडगा निघेल अशी आशा आहे.
लवकरच तोडगा काढायचा आहे
अमीनुल हक म्हणाले की, ‘याबाबत मंत्रालयीन स्तरावर काम सुरू आहे. आम्हाला क्रिकेट विश्वचषकासंदर्भातील कोंडी लवकरात लवकर सोडवायची आहे. आम्हाला आशा आहे की, हा प्रश्न लवकरच सुटेल. आम्हाला हा प्रश्न लवकर सोडवायचा आहे. मला खेळाच्या माध्यमातून हिंदुस्थानसोबत मजबूत आणि मैत्रीपूर्ण संबंध कायम ठेवायचे आहेत. आम्हाला सध्याचा अनिश्चिततेचा काळ सहजतेने पार करायचा आहे.’
मागील सरकारने खेळाडूंच्या सुरक्षितता आणि आरोग्याविषयी चिंता व्यक्त करत 2026 च्या टी-20 विश्वचषकासाठी संघ भारतात न पाठवण्याचा निर्णय घेतल्यापासून बांगलादेश मालिका संशयाच्या भोवऱ्यात आहे. त्यानंतर बांगलादेशच्या जागी
स्कॉटलंडचा स्पर्धेत समावेश करण्यात आला. तेव्हापासून नवीन सरकारने क्रीडा माध्यमातून संबंध सुधारण्याचा प्रयत्न केला आहे.
बांगलादेशच्या पंतप्रधानांची भेट
अमीनुल हक पुढे म्हणाले की, ‘हिंदुस्थानच्या उच्चायुक्तांनी पंतप्रधानांची भेट घेतली. आज आम्ही परराष्ट्र मंत्री आणि राज्यमंत्र्यांशीही बोललो. गेल्या टी-20 विश्वचषकाभोवती असलेले अनिश्चिततेचे वातावरण लवकरच दूर होईल अशी त्यांनाही खूप आशा आहे. आम्हाला आशा आहे की, मालिकेसंबंधित प्रश्न दोन्ही देशांच्या परराष्ट्र मंत्रालयांमधील चर्चेतून सोडवला जाईल.’
Comments are closed.