16 ऑगस्टपासून आशियाई ज्युनियर बुद्धिबळ स्पर्धा, जगभरातील 10 देशातील 157 खेळाडू होणार सहभागी

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

महाराष्ट्र बुद्धिबळ असोसिएशनतर्फे 16 ते 26 ऑगस्ट 2026 या कालावधीत आयोजित आशियाई ज्युनियर बुद्धिबळ स्पर्धेत (ओपन आणि मुली गट) जगभरातील 10 देशांतील 157 खेळाडू सहभागी होतील. यामध्ये 6 इंटरनॅशनल मास्टर्स (आयएम), 24 ‘फिडे मास्टर्स व वुमन फिडे मास्टर्स यांचा समावेश आहे. ऑल इंडिया चेस फेडरेशन, आशियाई चेस फेडरेशन आणि फिडे यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा मुंबईतील आयटीसी मराठा हॉटेल येथे आयोजित केली जाणार आहे.

आशियातील 20 वर्षांखालील सर्वोत्तम खेळाडूंचा सहभाग असलेल्या या स्पर्धेत क्लासिकल स्वीस प्रकारातील 9 फेऱ्यांव्यतिरिक्त रॅपिड आणि ‘ब्लिट्झ’ प्रकारातील प्रत्येकी 7 फेऱ्या खेळवल्या जातील. आशियाई ज्युनियर बुद्धिबळ यापूर्वी विश्वनाथन आनंद, अभिजित कुंटे, तेजस बाकरे (पुरुष गट) आणि तानिया सचदेव, कोनेरू हम्पी, इवाना फुर्टाडो (महिला गट) यांसारख्या दिग्गज खेळाडूंनी यश संपादन केले आहे. त्यामुळे देशातील ज्युनियर खेळाडूंमध्ये ही स्पर्धा अत्यंत प्रतिष्ठेची मानली जाते.

क्लासिकल स्विस प्रकारात 157 खेळाडू सहभागी होणार आहेत, तर रॅपिड प्रकारात 153 आणि ब्लिट्झ प्रकारात 151 खेळाडू खेळतील. ओपन गटातील खेळाडूंचे सरासरी ईलो रेटिंग 2054 आहे, तर ज्युनियर महिला गटातील खेळाडूंचे रेटिंग 1885 इतके आहे.

Comments are closed.