टीम इंडिया खेळणार 600वा कसोटी क्रिकेटचा सामना, आतापर्यंत राहिला असा रेकॉर्ड
नवी दिल्ली : टीम इंडिया शनिवारी (15 ऑगस्ट) श्रीलंकेविरोधात कसोटी सामना खेळण्यास सुरुवात करणार आहे. 2 कसोटी सामन्यांच्या पहिल्या कसोटीला श्रीलंकेतील गॅले येथे सुरुवात होणार आहे. भारताच्या इतिहासात या सामन्याला मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. कारण, टीम इंडियाचा हा 600 वा कसोटी सामना ठरणार असून युवा कर्णधार शुभमन गिल या सामन्यात संघांचे नेतृत्व करणार आहे. टीम इंडियाचा कसोटीतील आलेख हा चढउतारांचा राहिला आहे. कारण, पहिला सामना तसेच मालिका जिंकण्यासाठी टीम इंडियाला 20 वर्षे वाट बघावी लागली होती. Team India Test
टीम इंडियाचा कसोटी क्रिकेटचा पहिला सामना 25 जून 1932 रोजी सुरू झाला होता. तेव्हा टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध लॉर्ड्स मैदानावर आपला पहिला अधिकृत कसोटी सामना खेळला होता. यावेळी, टीम इंडिया कसोटी खेळणारा जगातील सहावा संघ ठरला होता. सुरुवातीच्या काळात कमकुवत मानल्या जाणाऱ्या टीम इंडियाने आज क्रिकेटविश्वात अव्वल स्थान पटकावले आहे.
25 जून 1932 रोजी सी. के. नायडू यांच्या नेतृत्वात टीम इंडियाने पहिला कसोटी सामना खेळला होता. इंग्लंडविरुद्ध झालेल्या या सामन्यात टीम इंडियाचा 158 धावांनी पराभव झाला होता.
कसोटी सामन्यात तब्बल 20 वर्षांनी टीम इंडियाला विजय मिळाला होता. 10 फेब्रुवारी 1952 रोजी चेन्नई येथे झालेल्या सामन्यात इंग्लंडचा परभव करत पहिला विजय नोंदवला होता. याचवर्षी टीम इंडियाने पाकिस्तानविरुद्ध 2-1 ने पहिली कसोटी मालिका जिंकली होती.
मन्सूर अली खान पटौदी यांच्या नेतृत्वात टीम इंडियाने न्यूझीलंडविरुद्ध परदेशी भूमीवर पहिला विजय आणि मालिका जिंकली.
1970 च्या दशकात टीम इंडियाने चांगली कामगिरी केली. यावेळी, सुनील गावस्कर, गुंडप्पा विश्वनाथ, बिशन सिंग बेदी, इरापल्ली प्रसन्ना, एस. चंद्रशेखर, वेंकटराघवन असे दिग्गज खेळाडू लाभले.
यानंतर सौरव गांगुली आणि महेंद्र सिंग धोनीच्या नेतृत्वात टीम इंडियाला अव्वल स्थानी पोहोचवले. गांगुलीने टीम इंडियाला परदेशात जिंकण्याची आक्रमक वृत्ती दिली. तर, धोनीच्या नेतृत्वात टीम इंडियाने अनेक विक्रम रचले.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये टीम इंडिया हा 2021 आणि 2023 मध्ये दोनदा उपविजेता ठरला आहे.
आतापर्यंत झालेल्या 599 सामन्यात टीम इंडियाने 186 सामन्यात विजय, 188 सामन्यात पराभव तर 224 सामने अनिर्णीत ठेवण्यात आले आहे. तसेच, एक सामना बरोबरीत सुटला.
Comments are closed.