नवरा बायकोतील भांडण मिटवण्यासाठी जापनीज उपाय




पती-पत्नीमधील वाद सोडवण्यासाठी जपानी मा पद्धती


नवरा-बायकोमध्ये खटके उडणे किंवा भांडण होणे ही अगदी सामान्य गोष्ट आहे. पण हेच रोजचे वाद विकोपाला जाऊन नात्यातील गोडवा संपू नये, यासाठी जपानमध्ये एक अनोखी आणि प्रभावी पद्धत वापरली जाते. ज्याला ‘मा’ टेक्निक असे म्हणतात. जपानमधील ही टेक्निक सध्या विशेष चर्चेत आहे. कोणत्याही मोठ्या वादाशिवाय आणि शांततेने नात्यातील दुरावा मिटवणारा हा जपानी फॉर्म्युला नेमका काय आहे, जाणून घेऊयात सविस्तरपणे, japanese ma technique in marathi

जपानी मा टेक्निक वापरताना काय लक्षात घ्याल?

1) भांडण झाल्यावर कोणीही एकमेकांशी बोलायचं नाही.
2) भांडणानंतर कोणाच्याही हातात फोन नसणार.
3) एकमेकांकडे रागाने पाहायचा नाही.

जपानी भाषेत मा या शब्दाचा अर्थ दोन गोष्टींमधील मोकळी जागा, विश्रांती. जसं कोणतंही गाणं म्हणताना दोन सुरांमध्ये असणारी शांतता जशी त्या गाणाला सुंदर बनवते, तसंच नात्यामध्ये दोन व्यक्तींमध्ये असणारी अर्थपूर्ण मोकळी जागा नात्यात आणखी मजबूत करते, अशी ही संकल्पना आहे. जापनीज जोडपी भांडण झाल्यावर भांडण वाढू नये यासाठी फक्त 3 मिनिटांचा मा पॉझ देतात. यादरम्यान ते एकमेकांशी काहीच न बोलता शांत राहतात. या टेक्निकमध्ये उदे्श एकमेकांना टाळणे नसून एकमेकांमधील भांडणं मिटवणे हा आहे, यामध्ये रागाच्या भरात निर्णय घेण्याऐवजी दोघेही शांत झाल्यानंतर योग्य वेळ आणि वातावरण निवडून विषयावर चर्चा करतात. या टेक्निकचा मुख्य उद्देश वादात कोण बरोबर किंवा चूक हे सिद्ध करणं नसून नातं टिकवणं आणि एकमेकांना समजून घेणं हा असतो.

ही टेक्निक काम कशी करते?

जेव्हा दोघांमध्ये भांडण होतात तेव्हा अनेकदा एकमेकांचे ऐकून घेण्यापेक्षा उलट उत्तर दिली जातात, ज्यामुळे भांडण वाढते. पण जेव्हा मा टेक्निक वापरली जाते. तेव्हा जोडीदाराने कोणतीही रागवणारी गोष्ट बोलल्यास 3 मिनिटं शांत राहायचे असते. यामुळे भांडण वाढत नाही.

हेही वाचा – Money Saving : घर खर्च कमी करण्यासाठी कुठून सुरुवात करावी?



Comments are closed.