Sawan 2026 : कोणत्या सोमवारी कोणती शिवामूठ? पाहा संपूर्ण यादी

हिंदू धर्मात भगवान शिवाच्या उपासनेसाठी अत्यंत पवित्र मानल्या जाणाऱ्या श्रावण महिन्याला 13 ऑगस्ट 2026 पासून सुरुवात झाली आहे. 11 सप्टेंबर 2026 पर्यंत चालणाऱ्या या महिन्यात महादेवाची पूजा, व्रत-वैकल्ये आणि उपवासाला विशेष धार्मिक महत्त्व आहे. यंदाच्या श्रावणात एकूण 4 श्रावणी सोमवार आले असून या दिवशी शिवलिंगावर विशिष्ट धान्य अर्पण करण्याची (शिवामूठ) जुनी परंपरा आहे. आज आपण यंदाच्या श्रावणात कोणती शिवामूठ कोणत्या सोमवारी शिवाला अर्पण करायची याविषयी जाणून घेऊयात.

यंदाचे 4 श्रावणी सोमवार पुढिलप्रमाणे –

पहिला श्रावणी सोमवार (17 ऑगस्ट)
शिवामूठ: तांदूळ

दुसरा श्रावणी सोमवार (24 ऑगस्ट)
शिवामूठ: तीळ

तिसरा श्रावणी सोमवार (31 ऑगस्ट)
शिवामूठ: मूग

चौथा श्रावणी सोमवार (7 सप्टेंबर)
शिवामूठ: गहू

शिवामूठ वाहण्याची पद्धत

श्रावणी सोमवारी भक्त उपवास ठेवून महादेवाला जल, बेलपत्र आणि त्या सोमवारी ठरलेले धान्य (तांदूळ, तीळ, मूग किंवा गहू) मूठभर अर्पण करतात.

श्रावणातील व्रत-वैकल्ये –

श्रावण महिन्यात केवळ शिवपूजनच नाही तर इतरही व्रत-वैकल्ये केली जातात. लग्नानंतरची पहिली पाच वर्षे मंगळागौरीचे पूजन केले जाते. यामध्ये नववधू आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते. याशिवाय श्रावण महिन्यात श्री शिवलीलामृत ग्रंथातील 11 वा अध्याय वाचणे शुभ मानले जाते. या अध्यायाच्या वाचनामुळे भक्तांना मानसिक शांती आणि अध्यात्मिक ऊर्जेचा अनुभव मिळतो.

हेही वाचा – Nag Panchami 2026 : जाणून घ्या तारीख, शुभ मुहूर्त आणि पूजा विधी

Comments are closed.