साप्ताहिक राशिभविष्य – रविवार 16 ऑगस्ट 2026 ते शनिवार 22 ऑगस्ट 2026
>> नीलिमा प्रधान
मेष – प्रकृतीची काळजी घ्या
रवि, बुध राश्यांतर कार्याला, गतिमान करेल. कोणताही वाद, गैरसमज वाढू देऊ नका. कायद्याला कमी लेखू नका. नौकरीत नम्रता ठेवा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात दिलासा देणारे प्रसंग घडतील. उतावळेपणा नको. प्रकृतीची काळजी घ्या. शुभ दि. १८, १९
वृषभ – लोकप्रियता वाढेल
रवि, बुध राश्यांतर दिशादर्शक ठरेल. अहंकार दूर ठेवा. तुमच्या क्षेत्रात अधिक प्रगती करण्याची संधी मिळेल. तुमचे स्थान मजबूत करा. नोकरीधंद्यात वाढ होईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात लोकप्रियता वाढेल. प्रतिष्ठा जपा. शुभ दि. १६, २०
मिथुन – वाहन जपून चालवा
रवि, बुध राश्यांतर, प्रतिष्ठा, गुणवत्ता वाढवणारे ठरेल. महत्त्वाची कामे सप्ताहाच्या सुरुवातीला करा. वाहन सावकाशपणे चालवा. नोकरीधंद्यात धावपळ होईल. रागावर ताबा ठेवा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात उन्नती होईल. शुभ दि. १८, १९
कर्क – किचकट प्रश्न सोडवा
रवि, बुध राश्यांतर तुमच्या कार्याला अधिक आकर्षक करतील. रागाला आवर घाला. संयम ठेवा. मोठे ध्येग गाठा. किचकट प्रश्न सोडवा. नोकरीधंद्यात उत्साहवर्धक घटना घडतील. राजकीय, सामाजिक क्षेत्रात योजनांना गती द्या. शुभ दि. १६. १७
सिंह – प्रतिष्ठेचे अवडंबर नको
रवि, बुध राश्यांतराने समस्येवरील उपाय लाभतील. प्रतिष्ठेचा बाऊ करू नका. चुका टाळण्याकडे लक्ष असू द्या. नोकरीच्या कामात लक्ष द्या. धंद्यात वाढ होईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात वरिष्ठांना कमी लेखू नका. तणाव टाळा. शुभ दि. १६, १७
कन्या – क्षुल्लक अडचणी येतील
रवि, बुध राश्यांतराने तुमच्या कार्यात क्षुल्लक अडचणी निर्माण होतील. अहंकार नको, गोड बोलण्याने यश मिळेल. नोकरीच्या कामात इतरांना मदत करा. वाद वाढवू नका. राजकीय, सामाजिक क्षेत्रात योग्य संवाद साधा. शुभ दि. १८. १९
तूळ – कामांना गतिमान करा
रवि, बुध राश्यांतर. रेंगाळलेल्या कामांना गतिमान करता येईल. क्षुल्लक तणाव जाणवेल. नम्रता ठेवा. भावनेच्या भरात आश्वासन देऊ नका. नोकरीत कामाचा ताण जाणवेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात मोह टाळा. प्रतिष्ठा जपा. शुभ दि. २०, २१
वृश्चिक – प्रवासात सावध रहा
रवि, बुध राश्यांतर, चातुर्याचा वापर केल्यास मोठे यश मिळेल. कठीण समस्या सोडवता येतील. रागावर नियंत्रण ठेवा. प्रवासात सावध रहा. नोकरीत वरिष्ठांना खूष करा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात लोकप्रियता वाढेल. बुद्धिमत्तेचे कौतुक होईल. शुभ दि. १६. २२
धनु – दिशाभूल होईल
रवि, बुध राश्यांतर दिलासा देणारे आहे. कुठेही अतिशयोक्ती नको. योग्य निर्णय घ्याल. दिशाभूल करण्याचा प्रयत्न होईल. योग्य निर्णय घ्या. प्रतिक्रिया सावधपणे व्यक्त करा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात गुप्त कारस्थाने होतील. शुभ दि. १६, १७
मकर – सावधपणे निर्णय घ्या
रवि, बुध राश्यांतर, क्षेत्र कोणतेही असो तणाव जाणवेल. गुप्त कारवाया होतील. धावपळ होईल. सावधपणे निर्णय घ्या. समस्या सोडवा, नोकरीत वरिष्ठांचा सल्ला घ्या. राजकीय, सामाजिक क्षेत्रात कायदा मोडेल असे भाष्य नको. शुभ दि. १६, १७
कुंभ – वागण्यात सावध राहा
रवि, बुध राश्यांतर. वाद होतील, काळजी घ्या. प्रकृतीकडे लक्ष द्या. महत्त्वाची वस्तू सांभाळा. खरेदी-विक्रीत उतावळेपणा नको. नोकरीत वरिष्ठांना दुखवू नका. राजकीय, सामाजिक क्षेत्रात शत्रुत्व वाढवू नका. व्यवहारात सतर्क रहा. शुभ दि. १८, १९
मीन – कायदा मोडू नका
रवि, बुध राश्यांतर. भावनेच्या आहारी न जाता निर्णय घ्या. नोकरीत दगदग होईल. धंद्यात अरेरावी टाळा. कायदा मोडेल असे वक्तव्य नको. वाहनाचा वेग नियंत्रणात ठेवा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तटस्थ भूमिका ठेवा. गैरसमज वाढतील. शुभ दि. १६, २०
Comments are closed.