Photo – ‘हॉटनेस ओव्हरलोडेड’ प्रार्थना बेहेरेच्या लूकने वेधले लक्ष

‘पवित्र रिश्ता’ ते मराठी मालिका ‘रेशीमगाठ’पर्यंत आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात वेगळे स्थान निर्माण करणारी प्रसिद्ध मराठी अभिनेत्री प्रार्थना बेहेरे सोशल मीडियावरही कायम चर्चेत असते. आपल्या अभिनयासोबतच तिच्या स्टायलिश अंदाजाचीही चाहत्यांमध्ये चर्चा होताना दिसते. नुकतेच प्रार्थनाने इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले असून, तिचा हा लूक सध्या लक्ष वेधून घेत आहे. या फोटोंमध्ये प्रार्थनाने निळा, पांढरा आणि काळ्या रंगाच्या प्रिंटचा को-ऑर्डिनेट बीचवेअर सेट घातला आहे. या आउटफिटवरील आकर्षक प्रिंट तिच्या बीच लूकला आणखी उठाव देत आहे. यावर प्रार्थनाने केस मोकळे सोडत आपल्या लूकला साधा आणि नैसर्गिक टच दिला आहे.  तिचा हा बीच लूक बोल्ड आणि एलिगंट दिसत आहे.

Comments are closed.