नोवाक जोकोविच सलामीलाच गारद
24 ग्रॅण्डस्लॅम विजेता नोवाक जोकोविचला सिनसिनाटी ओपनच्या पहिल्याच फेरीत अनपेक्षित धक्का बसला. अर्जेंटिनाच्या 25 वर्षीय थियागो अगस्टिन तिरांतेने तब्बल 2 तास 44 मिनिटे रंगलेल्या सामन्यात जोकोविचला 2-6, 6-4, 6-4 असे नमवत मोठा धक्का सहन करावा लागला.
विम्बल्डनच्या उपांत्य फेरीतील पराभवानंतर कोर्टवर परतलेल्या जोकोविचने पहिला सेट सहज जिंकला, मात्र त्यानंतर तिरांतेने खेळाची सूत्रे हाती घेत सलग दोन सेट जिंकत कारकीर्दीतील सर्वात मोठय़ा विजयांपैकी एक नोंदवला. उष्ण आणि दमट वातावरणात झालेल्या या सामन्यात पाचव्या मानांकित जोकोविचला आपली लय कायम राखता आली नाही. आता त्याचे लक्ष 30 ऑगस्टपासून सुरू होणाऱया अमेरिकन ओपनकडे असेल.
Comments are closed.