‘खतरों के खिलाड़ी 15’मध्ये स्टंटनंतर जॅस्मिन भसीनची स्मरणशक्ती झाली कमजोर? म्हणाली-‘मला काहीच आठवत नाही’ – Tezzbuzz
जस्मिन भसीन हि एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. आणि तिने ‘खतरों के खिलाडी 15’ च्या सेटवर आलेल्या एका भयानक अनुभवाबाबत सांगितले तिने सांगितले की, शोमध्ये पाणी आणि हवेतील स्टंट केल्यानंतर लगेचच तिची स्मरणशक्ती कमी झाली. आणि तपासणी नंतर असे लक्षात आलं की, तिच्या डोक्याला खापत झाली आहे. ज्यामुळे मेंदुवर परिणाम झाला यामुळे अभिनेत्री जस्मिनची स्मरणशक्ती तात्पुरती गेली होती. तसेच तिच्या या खुलाश्याने शो चे होस्टसुध्दा घाबरला होता.
तसेच अभिनेत्रीने सांगितले की, स्टंटनंतर लगेचच काय घडले हे तिला आठवत नव्हते. तिने पुढे सांगितले की, तिला अजूनही त्याबद्दल काहीही आठवत नाही. आणि माझ्यासाठी हा एक खुप भयानक अनुभव होता. आणि त्यावेळी मला काहीच आठवत नाही. मी इथे काय करत आहे? डॉक्टरांनी मला सांगितले की मला सौम्य दुखापत झाली आहे आणि 72 तास पूर्ण विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. असे तिने तिच्या इस्टा स्टोरी मध्ये सांगितले आहे.
जस्मिन भसीन हिने ‘नागिन: भाग्य का जहरीला खेल’, ‘खतरों के खिलाडी – मेड इन इंडिया’ आणि ‘बिग बॉस 14’ यांसारख्या शोमध्ये यापूर्वी दिसली होती. खतरों के खिलाडी या शोच्या वेळी घडलेल्या घटनावर अभिनेत्रीने या कठीण काळात साथ दिलेले शोचे सूत्रसंचालक रोहित (rohit)शेट्टी, चॅनल, प्रोडक्शन टीम आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे आभारही मानले. तसेच या स्टंट दरम्यान जखमी होऊनही जस्मिन भसीनने आपल्या टीमला विजय मिळवून दिला होता. हे कौतुकास्पद आहे.
हेही वाचा
रणबीरच्या ‘रामायण’चा चीनमध्ये डंका, युझर्स म्हणाले, ‘ही भारताची स्वतःची ‘द ओडिसी’
Comments are closed.