'जननायकन' ओटीटीची तारीख संपली आहे, किंवा तरखेला ओटीटी रिलीज होईल – दैनिक बॉम्बबॉम्ब
साउथ सुपरस्टार थलपती विजयचा चित्रपट जना नायकन काही दिवसांपुर्वी चित्रपटगृहा रीलीज झाला होता. आणि आता तो डिजिटल पदार्पणासाठी सज्ज झाला आहे. विजयचा या राजकरणात जाण्यापुर्वी शेवटचा चित्रपट होता आणि बऱ्याच अडथळ्यानंतर या चित्रपटाला रीलीज डेट मिळाली. आणि त्यामुळे प्रेक्षक हा चित्रपट पाहण्यासाठी उत्सुक होते तसेच हा विजयचा शेवटाचा हि चित्रपट होता त्यामुळे प्रेक्षकांचे या चित्रपटांला भरपुर प्रेम मिळाले. मात्र ज्या प्रेक्षकांनी हा चित्रपट पाहिला नाही त्यांना आता ott पाहता येणार आहे.
‘जना नायकन’ हा चित्रपट आता ओटीटी प्लॅटफॉर्म ZEE5 वर रिलीज करण्यात येणार आहे. तर या सेन्सॉरशिप प्रक्रियेतील विलंबामुळे, हा चित्रपट मूळ नियोजनापेक्षा खूप उशिरा प्रदर्शित झाला होता. मात्र हा चित्रपट रिलीज नंतर एका महिन्याच्या आताच ओटीटी वर रिलीज होत आहे.
मात्र चित्रपटाने पहिल्याच आठवड्या उत्तम कामगिरी केली होती. आणि नंतर काही दिवसांत चित्रपटाची कमाई थोडी मंदावली. बॉक्स ऑफिस ट्रॅकर्स आणि व्यापार विश्लेषकांच्या मते, चित्रपटाने भारतात अंदाजे 196 कोटींची एकूण निव्वळ कमाई केली, तर त्याचा जगभरातील व्यवसाय 320 कोटींच्या पुढे गेला. त्यामुळे चित्रपट जरी एका महिन्याच्या आत ott येत असला तरी याने बॉक्स ऑफिस बऱ्यापैकी कमीई केली आहे. आणि प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे.
‘जना नायकन’ हा चित्रपट 21 ऑगस्ट 2026 रोजी ओटीटी प्लॅटफॉर्म ZEE5 तुम्ही पाहु शकता. विजय अभिनीत या चित्रपटाला थेटरमध्ये उत्तम प्रतिसाद मिळाला आणि आता ओटीटीवर या चित्रपटाला कसा प्रतिसाद मिळतो हे पाहण्यासारखे आहे.
हेही वाचा
‘आवारापन 2’ चित्रपटाचा बॅाक्सऑफिसवर धुमाकुळ, 100 कोटींच्या क्लबमध्ये चित्रपट झाला दाखल
Comments are closed.