IND vs SL 600 व्या कसोटी सामन्यात टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय, श्रीलंकेचा 165 धावांनी उडवला धुव्वा
पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडियाने श्रीलंकेचा 165 धावांनी पराभव केला. श्रीलंकेतील गॅल्ले मैदानावर पार पडलेल्या या सामन्यात नवोदित गोलंदाज मानव सुथार याने दहा विकेट घेत श्रीलंकन फलंदाजांचा धुव्वा उडवला. या विजयासह टीम इंडियाने दोन सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे. विशेष म्हणजे टीम इंडियाचा हा 600 वा कसोटी सामना होता.
साठी क्लिनिकल विजय #TeamIndia गॉल कसोटीत.
मानव सुथारच्या दुसऱ्या डावात 6 बळी, भारताने श्रीलंकेवर 165 धावांनी विजय मिळवला.
स्कोअरकार्ड – https://t.co/M9LVyCAp8y #SLvIND pic.twitter.com/QxAhFQGZke
— BCCI (@BCCI) 19 ऑगस्ट 2026
टॉस जिंकून टीम इंडियाने प्रथम फलंदाजी स्वीकारली होती. देवदत्त पडिक्कल याच्या 167 धावांच्या दमदार फलंदाजीच्या जोरावर व केएल राहुल आणि ध्रुव जुरेल यांच्या अर्धशतकामुळे टीम इंडियाने पहिल्या डावात 462 धावा केल्या. त्यानंतर फलंदाजीला आलेल्या श्रीलंकेने 284 धावा केल्या.
दुसऱ्या डावात फलंदाजीला उतरलेल्या टीम इंडियाने 193 धावात करत श्रीलंकेला विजयासाठी ३७२ धावांचे मोठे आव्हान ठेवले होते. मात्र मानव सुथारच्या जबरदस्त गोलंदाजीपुढे श्रीलंकंन फलंदाजांनी नांगी टाकल्या. श्रीलंकेचा संपूर्ण संघ अवघ्या 206 धावांवर बाद झाला. यातील सहा गडी मानवने बाद केलेले होते.
Comments are closed.