Pune News – नवले पुलावजळ पुन्हा अपघात; 5 ते 6 वाहने एकमेकांना धडकली, रिक्षाचालक गंभीर जखमी
पुण्यातील नवले पुलाजवळ पुन्हा एकदा अपघाताची घटना घडली आहे. सुमारे 5 ते 6 वाहने एकमेकांना धडकली. या अपघातात एक रिक्षा चालक गंभीर जखमी झाला असून वाहनांचेही मोठे नुकसान झाले आहे. या अपघातामुळे पुणे-बंगळुरू महामार्गावर वाहतूक कोंडी झाली आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले आहे.
एबीपी माझाने दिलेल्या वृत्तानुसार, कात्रजकडून नवले पुलाच्या दिशेने येणाऱ्या रस्त्यावर बुधवारी दुपारच्या सुमारास हा अपघात घडला. अपघातामुळे मोठी वाहतूक कोंडी झाली असून अपघातग्रस्त वाहने रस्त्यावरून हटवण्याचे काम सुरू आहे. अपघातामुळे वाहतूक व्यवस्थापन आणि रस्ते सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
Comments are closed.