सोनाक्षीच्या ट्रोलिंगमागे भाजप आयटी सेल, शत्रुघ्न सिन्हा यांचा दावा

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

मुलगी सोनाक्षी सिन्हा हिला सोशल मीडियावर जे ट्रोलिंग केले जाते, त्यामागे दुसरे तिसरे कोणी नसून भाजपचा आयटी सेल काम करत आहे, असा दावा बॉलीवूड अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांनी केला आहे.

सोनाक्षीवर आरोप होतोय की, तिने कॉक्रोज जनता पार्टीच्या दिल्लीतील ‘जंतर मंतर’वरील आंदोलनावर उघडपणे मत व्यक्त केले होते, परंतु झारखंडमधील विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर ती काहीच बोलली नाही, शांत दिसली, असा प्रश्न विचारल्यानंतर शत्रुघ्न सिन्हा म्हणाले, सोनाक्षी एक समजूतदार मुलगी आहे आणि तिला माहीत आहे की कधी आणि कोणत्या मुद्दय़ावर आपले मत मांडायचे. काही दिवसांपूर्वीच सोनाक्षीकडून झारखंडमधील मुलांच्या समर्थनार्थ पाठिंबा आला होता, असे ते म्हणाले.

Comments are closed.