श्वेता तिवारीच्या ऑनलाइन ऑर्डरमध्ये झुरळ; तुकाराम मुंडे यांना टॅग करत केली कारवाईची मागणी

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारी सोशल मीडियावरही चांगलीच सक्रिय असते. नुकतेच तिने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक व्हिडिओ शेअर करत ऑनलाइन ऑर्डरबाबत धक्कादायक अनुभव सांगितला. क्विक-कॉमर्स प्लॅटफॉर्मवरून मागवलेल्या कोल्ड्रिंकच्या डिलिव्हरीसोबत तिच्या घरी चक्क झुरळ आल्याचा दावा श्वेताने केला आहे.

श्वेताने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये घरात फिरणारे झुरळ दिसत आहे. विशेष म्हणजे, या प्रकरणाची दखल घेण्यासाठी तिने महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाचे (FDA) आयुक्त तुकाराम मुंडे यांना टॅग केले आहे. तसेच संबंधित क्विक-कॉमर्स प्लॅटफॉर्मलाही तिने टॅग करत या प्रकाराकडे लक्ष वेधले. श्वेताने इन्स्टाग्राम स्टोरीवर व्हिडिओ शेअर करत सांगितले की, त्यांनी इन्स्टामार्टवरून रेड बुल ऑर्डर केले होते.

मात्र, या ऑर्डरसोबत त्यांच्या घरात एक अनपेक्षित पाहुणाही आला. घरात झुरळ आल्याचे तिने व्हिडिओमध्ये दाखवले. व्हिडिओमध्ये श्वेता म्हणते, “आम्ही इन्स्टामार्टवरून रेड बुल ऑर्डर केले आणि त्यासोबत आमच्या घरात एक झुरळ आले. बघा, एक झुरळ संपूर्ण घरात धावत आहे.”

यानंतर श्वेताने तुकाराम मुंडे यांना टॅग करत त्यांच्याकडे लक्ष देण्याची विनंती केली. ती म्हणाली, “मुंडेजी, आत्ता आमच्या घरात झुरळं येत आहेत. तुम्ही कुठे आहात? कृपया लक्ष द्या.”

या प्रकारानंतर श्वेताने संबंधित प्लॅटफॉर्मकडून योग्य ती दखल घेतली जावी, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. दरम्यान, या प्रकरणावर तुकाराम मुंडे किंवा संबंधित कंपनीकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया समोर आलेली नाही.

Comments are closed.