कपल्समध्ये का वाढतोय फूड डिवोर्स ट्रेंड?





डिवोर्स म्हटले की नातं तोडणे हा विचार येतो. परंतू फूड डिवोर्सचा याच्याशी काहीही संबंध नाही. जेव्हा एकत्र राहणारे कपल रोजच्या जेवणावरून होणारे वाद टाळण्यासाठी स्वत:च्या आवडीनुसार वेगवेगळी ग्रॉसरी शॉपिंग करतात, जेवणंही वेगळं करतात, त्याला फूड डिवोर्स असे म्हटले जाते. food divorce trend in couples

ट्रेंड लोकप्रिय का होतोय?

  • एका जोडीदाराला प्रोटीन डाएट किंवा सॅलड हवे असते, तर दुसऱ्याला फास्ट फूड किंवा जंक फूडची आवड असते. अशा वेळी तडजोड न करता दोघेही आपापले आवडते अन्न खाऊ शकतात.
  • कामाच्या वेगवेगळ्या वेळांमुळे जेवणाची वेळ जुळत नाही. त्यामुळे एकमेकांची वाट न पाहता ज्याला जेव्हा भूक लागेल तेव्हा तो जेवतो.
  • दररोज काय खायचं?, काय बनवायचं? यावर चर्चा करण्यात आणि निर्णय घेण्यात जाणारा वेळ व होणारा मनस्ताप या पद्धतीमुळे वाचतो.
  • नात्यातील गोडवा टिकवण्यासाठी रोज एकत्रच जेवले पाहिजे असा नियम नाही, तर एकमेकांच्या आवडीचा आणि स्वातंत्र्याचा आदर करणे महत्त्वाचे आहे हीच या ट्रेंडमागची मुख्य संकल्पना आहे.

तोटे –

  • दोघांसाठी वेगवेगळा स्वयंपाक करणे किंवा रोज वेगवेगळ्या ठिकाणाहून ऑनलाईन जेवण मागवणे यामुळे महिन्याचे कौटुंबिक बजेट प्रचंड प्रमाणात वाढते.
  • तज्ज्ञांच्या मते जेवणाच्या टेबलावरील अंतर भविष्यात भावनिक अंतर वाढवण्यास फूड डिवोर्स कारण ठरू शकते.
  • रात्रीचे जेवण ही अशी वेळ असते जिथे पती-पत्नी दिवसभराचा थकवा विसरून एकमेकांशी संवाद साधतात. परंतू, एकत्र न जेवल्यामुळे नात्यातील हा जिव्हाळा आणि संवाद हळूहळू कमी होऊ लागतो.

हेही वाचा – आजी-आजोबांना मोबाईल शिकवताना या गोष्टी नक्की सांगा



Comments are closed.