महात्मा फुलेंच्या समग्र वाङ्मयाचे सात भाषांमध्ये अनुवाद
महात्मा जोतिबा फुले यांच्या द्विशताब्दी जयंतीवर्षानिमित्त राज्य सरकारतर्फे महात्मा जोतिबा फुले यांच्या समग्र वाङ्मयाचा हिंदी, सिंधी, गुजराती, संस्कृत, तेलुगू, बंगाली आणि बंजारा या सात भाषांमध्ये अनुवाद करण्यात येईल, अशी घोषणा करण्यात आली.
साहित्यिक आदान-प्रदानाला प्रोत्साहन देण्यासाठी आज प्रभादेवी येथील पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी येथे एकदिवसीय अनुवाद कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेचे उद्घाटन करताना सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी ही घोषणा केली. या उपक्रमाअंतर्गत महात्मा ज्योतिबा फुले यांचे ८६१ पानांचे समग्र वाङ्मय सात भाषांमध्ये अनुवादित केले जाणार आहे.
Comments are closed.