पावसामुळे दिल्लीतील जनजीवन विस्कळीत झाले आहे.
एअरपोर्ट रोडसह द्वारका अंडरपास पाण्याखाली
नवी दिल्ली : राजधानीत गुरुवारी सकाळी झालेल्या मुसळधार पावसानंतर अनेक भागांमध्ये पाणी साचले. जनपथ, चाणक्यपुरी आणि दक्षिण दिल्लीत वाहतुकीवर परिणाम झाला. दिल्ली-एअरपोर्ट रोड आणि द्वारका अंडरपासवर पाणी साचल्याने प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागला. दक्षिण दिल्लीसह राजधानीतील अनेक भागांमध्ये पहाटे मुसळधार पाऊस झाला. जनपथ, चाणक्यपुरी आणि इतर भागांनाही पावसाचा फटका बसल्याने जनजीवन विस्कळीत झाले. राव तुला राम मार्गावरील वाहतूक मंदावल्याने प्रवाशांना गैरसोय झाली. ऐन कामाला जाण्याच्या वेळेसही पाऊस सुरू राहिल्याने अनेक लोकांना अडचणींचा सामना करावा लागला.
Comments are closed.