बिस्कीट, ब्रेड जॅम, की सँडविच मुलांना टिफीनमध्ये काय द्याव?





मुलांना दररोज टिफीनमध्ये काय द्याव हा प्रश्न सगळ्याच आयांना पडतो. कारण मुलांना उत्साह आणि उर्जा मिळवून देणारे पदार्थ खाण्यास देणे महत्वाचे असते. पण नेहमीच भाजी पोळी खाऊन कंटाळलेल्या मुलांना टिफीनमध्ये नेहमी वेगवेगळे पदार्थ हवे असतात. यामुळे मुलांना टिफीनमध्ये कधी पोहे, ब्रेड जॅम, पराठा, मॅगी तर कधी सँडविच दिले जाते. पण यातील कोणता पदार्थ मुलांच्या आरोग्यासाठी चांगला आहे ते बघूया.

आलू पराठा- मुलांच्या आवडीचा असतो. तज्ज्ञांनुसार जर मुल स्थूल असेल तर पराठ्यात बटाटा न देता पनीर टाकून देणे चांगले. तर जी मुलं अशक्त असतात त्यांना आलू पराठा द्यावा.

ब्रेड जॅम- ब्रे़ड जॅम हा मुलांच्या आवडीचा पदार्थ आहे. पण तज्ज्ञांनुसार मुलांना टिफीनमध्ये ब्रे़ड जॅम देऊ नये.

पोहे- मुलांना टिफीनमध्ये पोहे देऊ शकता. पण दररोज देणे टाळावे. पण यात शेंगदाणे किंवा पनीर टाकून दिल्यास मुलांना प्रोटीन मिळते.

सँडविच-सँडविच हे मुलांच्या टिफिनसाठी चांगला पर्याय आहे. मात्र नेहमी टिफीन मध्ये सँडविच देऊ नये.

चिप्स,बिस्कीट,डोनट्स- काहीजण मुलांना टिफीनमध्ये चिप्स, बिस्कीट,डोनट्स देतात. पण हे सर्व पदार्थ आरोग्यासाठी घातक आहेत.



Comments are closed.