म्हातारपण आल्यावर पुन्हा तरुण होणारा अद्भुत जीव
पृथ्वीवर जन्माला आलेल्या प्रत्येकाचा कधी ना कधी मृत्यू होतोच, हे अढळ सत्य आहे. एखादा जीव जन्माला आला की, बालपण, किशोरवय, तारूण्य आणि त्यानंतर वृद्धापकाळ अशा वयाच्या विविध टप्प्यातून जातो. बहुतेक जीवांच्या आयुष्याचं चक्र असंच असतं आणि जन्म तसा मृत्यूही निश्चित असतो. परंतू आज आम्ही तुम्हाला अशा एका जीवाबद्दल सांगणार आहोत जो म्हातारा झाल्यानंतर पुन्हा तरुण होतो. हो ! पृथ्वीवर एक असा जीव आहे, ज्याचा कधीच मृत्यू होत नाही.
मृत्यूला चकवा देणाऱ्या या जीवाचे नाव अमर जेलीफिश असे आहे. याचे दुसरे नाव ट्युरिटोप्सिस डोहर्नी असेही आहे. हा जीव समुद्राच्या खोल तळाशी असतो आणि त्याची ओळख जगातील एकमेव अमर प्रजाती अशी आहे. उष्णकटिबंधीय प्रदेश आणि थंड महासागरांमध्ये आढळणारी एक अत्यंत लहान पारदर्शक जेलीफिश आहे. शास्त्रज्ज्ञांच्या मते, या जीवाचे वैशिष्ट्य म्हणजे वय उलट करण्याची क्षमता. याचा अर्थ असा की जेव्हा हा जीन वयस्कर होऊ लागतो किंवा धोक्यात येतो तेव्हा तो पुन्हा तरुण स्थितीत परत येतो.
जेव्हा जेलिफिश वृद्धावस्थेत जाते त्या जेलिफिशला मेडुसा म्हटले जाते. अशा अवस्थेत जेलिफिश त्याच्या टेंटॅकल्स टाकून देते. त्यानंतर त्याच्या पुनर्जन्माचा प्रवास सुरू होतो. अशा प्रकारे जेलिफिशचा कधीच मृत्यू होत नाही.
शास्त्रज्ज्ञ काय सांगतात?
शास्त्रज्ज्ञ सांगतात की, त्यांच्या डीएनएमध्ये विशिष्ट जीन्स आहेत. ज्या त्याला त्याच्या पेशी वारंवार दुरुस्त करण्याची आणि नूतनीकरण करण्याची क्षमता देतात. ज्यामुळे जेलीफिश पुन्हा तरूण होऊ शकतो.
अमर जेलीफिश खरंच अमर आहेत का?
जेलीफिशला अमर म्हटले तरी ते पूर्णपणे अमर नाहीत. त्यांचा मृत्यू शिकार, रोग किंवा समुद्रातील नैसर्गिक धोक्यांमुळे होऊ शकतो.
हेही वाचा – World Photography Day: सोलो ट्रॅव्हल करताना स्वतःचे फोटो कसे काढायचे?
Comments are closed.