आमदार खासदार फोडताना रातोरात पैशांचे खोके पाठवले जातात शेतकऱ्यांचा विषय आला की विलंब; रोहित पवार यांची टीका

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

महायुती सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर करून अनेक महिने उलटले तरी अद्याप शेतकऱ्यांना कर्जमाफीचे पैसे मिळालेले नाहीत. त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली आहे. ”आमदार खासदार फोडताना रातोरात पैशांचे खोके पाठवले जातात शेतकऱ्यांचा विषय आला की विलंब होतो’, अशी टीका रोहित पवार यांनी केली आहे.

”सरकारने आधी ३० जून पर्यंत शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचं आश्वासन दिलं मात्र कर्जमाफी जाहीर करताना अनेक अटीशर्ती टाकल्या, त्या काढण्यासाठी आम्हाला आंदोलन-उपोषण करावं लागलं. अटी काढल्यानंतर आम्हाला वाटलं आता तरी शेतकऱ्यांना दिलासा मिळेल. २ जूनला राज्य सरकारने कर्जमाफीचा GR काढला खरा पण ३० जून उलटून त्यानंतर अनेक तारखा गेल्या आणि अधिवेशनही संपलं तरी अजूनही शेतकरी कर्जमाफीचं काम अत्यंत संथगतीने सुरूय. कर्जमाफी जाहीर होऊन ८० हून अधिक दिवस उलटले तरी ५६ लाख शेतकऱ्यांपैकी केवळ ६ लाख शेतकऱ्यांनाच कर्जमाफी देण्याचं काम सुरुय. हे प्रमाण केवळ १० टक्के असून याच गतीने कर्जमाफी होत राहिली तर सगळ्या शेतकऱ्यांना लाभ देण्यास दीड-दोन वर्षे लागतील. एरवी आमदार खासदार फोडताना रातोरात पैशांचे खोके पाठवले जातात मात्र विषय शेतकऱ्यांचा आला की विलंब होतो. सरकारने राहिलेल्या याद्या लवकरात लवकर जाहीर करून अडचणीत असणाऱ्या बळीराजाला तातडीने कर्जमाफीचा दिलासा द्यावा”, असे रोहित पवार यांनी ट्विट केले आहे.

Comments are closed.